T20 World Cup 2022: आयसीसीच्या (ICC) टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाची (Team India) खिल्ली उडवली. त्यांच्या ट्विटला भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणनं (Irfan Pathan) सडेतोड उत्तर दिलंय. 


भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं 10 विकेट्स सामना गमावला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक ट्विट केलं. ज्यात त्यांनी  "So, this Sunday, it’s: 152/0 vs 170/0" असं लिहलं. शाहबाज शरीफ यांनी केलेल्या ट्विटमध्ये दोन सामन्यातील धावसंख्येचा उल्लेख करण्यात आलाय. पहिली धावसंख्या म्हणजे, मागच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्ताननं भारताविरुद्ध 152 धावा करत 10 विकेट्सनं विजय मिळवला होता. दुसरी धावसंख्या म्हणजे, यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताविरुद्ध 170 धावा करत 10 विकेट्सनं सामना जिंकला. 


ट्वीट-




 


इरफान पठाणचं सडेतोड उत्तर
पाकिस्तानचं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या ट्विटला उत्तर देताना इरफान पठाण यांनी लिहिलं की, "तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सुखी. त्यामुळेच स्वत:चा देश सुधारण्याकडं लक्ष नाही." या ट्विटनंतर शाहबाज शरीफ यांना खूप ट्रोल व्हावं लागलं. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार बाबर आझम यांनाही पत्रकारांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारला. यावर बाबर म्हणाला की, "आमच्यावर कोणताही दबाव नाही, पण मला या ट्विटबद्दल कोणतीही माहिती नसल्यानं मी माफी मागतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की, आम्ही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू."


यंदाही पाकिस्तानचा संघ रोजे ठेवून फायनल खेळणार
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी (12 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ प्रत्येक गोष्टी करून पाहतोय, ज्यामुळं त्यांना विश्वचषकावर नाव कोरता येईल. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे खेळाडू आणि सदस्यांनी रोजे ठेवले आहेत. रोजे ठेवल्यानं त्यांना 1992 सारखा विजय प्राप्त होईल, असं त्यांचा विश्वास आहे. पाकिस्तानच्या संघानं 1992 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं होतं.



हे देखील वाचा-