T20 World Cup 2022 Prize Money: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. पाकिस्ताननं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. तर, इंग्लंडनं भारताविरुद्ध 10 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेतील विजेता संघाला 1.6 मिलियन म्हणजेच जवळपास 13 कोटी रुपये मिळतील. तर, रनरअप संघाला सुमारे 0.8 मिलियन रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. 

याशिवाय, सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडलेल्या दोन संघांना प्रत्येकी $400,000 आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या आणि सुपर 12 टप्प्यात बाहेर पडलेल्या इतर आठ संघांना प्रत्येकी $70,000 मिळतील. म्हणजेच, सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभूत झालेल्या भारतीय संघाला 0.4 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 3.26 कोटी रुपये मिळणार आहेत. 

टी-20 विश्वचषकातील बक्षीसांची संपूर्ण यादी:

संघ बक्षीस भारतीय चलनानुसार
विजेता 1.6 मिलियन डॉलर जवळपास 13 कोटी
उप- विजेता 0.8 मिलियन डॉलर जवळपास 6.5 कोटी
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ 0.4 मिलियन डॉलर जवळपास 3.26 कोटी
सुपर-12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख
सुपर-12 मधून बाहेर पडणारा प्रत्येक संघ 70 हजार डॉलर जवळपास 57.09 लाख
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख
पहिल्या फेरीतून बाहेर पडलेला संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख

 

फायनलमध्ये पाऊस पडला किंवा सामना टाय झाला तर...
आयसीसीच्या निवेदनानुसार, 'इव्हेंट टेक्निकल कमिटीने निर्णय घेतला आहे की, सामना पूर्ण करण्यासाठी आणि निकाल मिळविण्यासाठी अंतिम सामन्याच्या अतिरिक्त दिवसाच्या वेळेत दोन ते चार तासांपर्यंत वाढ केली जाऊ शकतो. टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या दरम्यान,आवश्यक षटकं देखील कापली जातील, परंतु निर्धारित दिवशी किमान षटके टाकली गेली नाहीत, तर सामना राखीव दिवशी खेळला जाईल." दरम्यान, साखळी सामन्यांमध्ये सामन्यांचा निकाल लावण्यासाठी पाच षटकांचा खेळ होणं गरजेचं होतं. त्यानंतर नॉकआऊट सामन्यात किमान 10 षटकांच्या खेळानंतरच सामन्याचा निकाल लावला जाईल, असा नियम होता. अंतिम सामन्यात दोन्ही संघामध्ये 10 षटके खेळली पाहिजेत. पण पावसामुळं दोन्ही दिवस खेळ झाला नाही तर, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्रॉफी विभागून दिली जाईल, असा आयसीसीचा नियम आहे. 

हे देखील वाचा-