Paris Masters Draw: पॅरिस मास्टर्सनं शुक्रवारी पॅलेस ऑम्निस्पोर्ट्स डी पॅरिस-बर्सी येथे 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या 2022 स्पर्धेचा ड्रॉ जाहीर केला. दरम्यान, 22 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा स्पेनचा राफेल नदाल (Rafael Nadal) या स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. यूएस ओपनमधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धात्मक टेनिसमधील ही त्याची पहिलीच स्पर्धा असेल. या ड्रॉमध्ये नोवाक जोकोविच (Novak Djokovic) देखील असेल, ज्यानं या महिन्याच्या सुरुवातीला दोन विजेतेपदे जिंकली आहेत. सध्याच्या जागतिक क्रमवारीत स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ (Carlos Alcaraz) अव्वल स्थानी आहे. 


ट्वीट-






 


राफेल नदालच्या नावावर 22 ग्रँडस्लॅम
फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक स्पेनच्या राफेल नदालनं जागतिक क्रमवारीत 8 क्रमांकाच्या नॉर्वेजियन कॅस्पर रुडचा पराभव केला. या विजयासह राफेल नदालनं चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचं विजेतेपद जिंकलं. तर, 22वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं.


राफेल नदालची जबरदस्त कामगिरी
नदालनं 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019, 2020, 2022 मध्ये असं 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर, 2009 आणि 2022 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.  याशिवाय, त्यानं 2008 आणि 2010 मध्ये वम्बिलडन आणि  2010, 2013, 2017, 2019 मध्ये यूएस ओपनचा खिताब जिंकला आहे.


राफेल नदालच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन 
स्पेनचा स्टार टेनिसपटू आणि 22 ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. नदालची पत्नी मारिया फ्रान्सिस्का पेरेलोनं8 ऑक्टोबरला आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. मारिया ही आई होणार असल्याची माहिती नदालनं जुलै महिन्यात दिली होती. नदाल वडील झाल्याची माहिती स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दिली होती.


हे देखील वाचा-


Shadab Khan: झिम्बाब्वेविरुद्ध पराभव जिव्हारी, शादाब खान पव्हेलियमध्येच ढसाढसा रडला; इमोशनल व्हिडिओ समोर