NZ vs SL Match Live Streaming : टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत आज न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने झाले असून श्रीलंकेने एका सामन्यात विजय मिळवला आहे तर एक सामना गमावला आहे. न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिली असून त्यांचा एक सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यात शुक्रवारी ग्रुप 1 मधील दोन सामन्यांपैकी एकही सामना पावसामुळे होऊ न शकल्याने आजचा हा न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना महत्त्वाचा असणार आहे. तर या महत्त्वाच्या सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ... 

कधी आहे सामना?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका हा सामना आज अर्थात 29 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

कुठे आहे सामना?

हा सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट स्टेडियम (Sydney Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल.

शुक्रवारी झाला नाही एकही सामना

विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी अर्थात 28 ऑक्टोबरला ग्रुप 1 मधील अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे दोन सामने रंगणार होते. पण मेलबर्नमध्ये होणाऱ्या तुफान पावसामुळे दोन्ही सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आज एकही विश्वचषकाचा सामना खेळवला गेला नाही. त्यात साखळी सामन्यांसाठी अधिकचा दिवस नसल्याने सामना रद्द झालेल्या संघाना एक-एक गुण देण्यात आला आहे.  

असा आहे ग्रुप 1 पॉईंट्स टेबल

संघसामनेविजयपराभवगुणनेट रन रेट
न्यूझीलंड21034.450
इंग्लंड31130.239
आयर्लंड3113-1.170 
ऑस्ट्रेलिया3113-1.555
श्रीलंका21120.450
अफगाणिस्तान3012-0.620

हे देखील वाचा-