T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत (T20 World Cup 2022) मोठमोठे उलटफेर होताना दिसत आहेत. सर्वाधिक विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघ पात्रता फेरीतून बाहेर गेला. त्यानंतर आयर्लंडने इंग्लंडला मात दिली आणि मग पाकिस्तानवर झिम्बाब्वेच्या संघाने अवघ्या एका धावेच्या फरकाने रोमहर्षक असा विजय मिळवला. पाकिस्तानच्या या धक्कादायक पराभवानंतर क्रिकेट जगतात फक्त याच सामन्याची चर्चा होताना दिसत आहे. पाकिस्तानचा हा पराभव पाकिस्तानी खेळाडूंच्या चांगलाच जिव्हारी लागला असून कर्णधार बाबरची सामन्यानंतरची रिएक्शन व्हायरल होत असताना अष्टपैलू शादाब खान तर चक्क रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.


झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान सामन्यात आधी फलंदाजी करत झिम्बाब्वे संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. झिम्बाब्वेकडून सेन विल्यम्सनं सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. ज्यानंतर 131 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना अगदी रोमहर्षक क्रिकेट मैदानात पाहायला मिळालं, दरम्यान अखेर पाकिस्तानचा खेळाडू धावचीत झाला आणि सामना पाकिस्ताननं गमावला त्यावेळी कर्णधार बाबरने दिलेली रिएक्शन सर्वत्र व्हायरल होऊ लागली. 






तसंत पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शादाब पाकिस्तानी ड्रेसिंग रूमच्या बाहेर गुडघ्यावर बसून चक्क रडताना दिसत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात शादाब खानने चमकदार कामगिरी केली. चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 23 धावा देत त्याने गोलंदाजीत तीन विकेट्स घेतले. शादाबने फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत 17 धावा केल्या. पण तरीही पाकिस्तान सामना जिंकू न शकल्याने अखेर शादाबला रडू कोसळलं.




हे देखील वाचा-


T20 World Cup 2022 : पाकिस्तानची खराब कामगिरी शोएब अख्तर झोंबली, म्हणतो 'पुढच्या आठवड्यात भारतही स्पर्धेबाहेर होणार'