Virat Kohli in T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कमाल फॉर्ममध्ये दिसत आहे. मागील जवळपास दोन वर्षे खराब फॉर्मशी झुंज दिल्यावर आशिया कप 2022 स्पर्धे फायनली कोहली फॉर्मात परतला आणि पुन्हा एकदा दमदार खेळीने भारताला सामने जिंकवून देऊ लागला आहे. दरम्यान विश्वचषकाच्या सलग दोन सामन्यात दोन अर्धशतकं झळकावल्यानंतर विराट आता आणखी नवे रेकॉर्ड करणार असं दिसून येत आहे. पण असं असतानाही क्रिकेट इतिहासात विराटच्या मते तो नाही तर इतर दोन क्रिकेटर सर्वोत्कृष्ट आहेत...सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना विराटने भारताचा महान माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज लीजेंड सर विवीयन रिचर्ड्स हे दोघे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचं वक्तव्य केलं आहे.
आजही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा या सचिन तेंडुलकरच्या नावावर असून त्यापूर्वी विश्वचषक सुरु झाल्यापासून विवियन रिचर्ड्स यांनी उत्कृष्ट कामगिरीने अनेक रेकॉर्ड केले होते. दोघांच्या नावावर बरेच विक्रम असल्याने क्रिकेच जगतात दोघांना महान फलंदाज म्हणून मान आहे. त्यामुळे विराटसाठी देखील हे दोघेच क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज आहेत.
विराटला नावे केला आणखी एक विक्रम
गुरुवारी विराटने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतकीय खेळी केली. या कामगिरीसह विराटनं वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडीत काढलाय. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचलाय. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एकमेव श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेनं एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. जयवर्धनेनं टी-20 विश्वचषकाच्या 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीच्या नावावर सध्या 989 धावांची नोंद आहे. या यादीत ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं टी- 20 विश्वचषकातील 31 डावात 965 धावा केल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यापूर्वी विराट 927 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. ख्रिस गेलला मागं टाकण्यासाठी विराट कोहलीला अवघ्या 38 धावांची आवश्यकता होती. दरम्यान, नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात त्यानं 62 धावांची खेळी करत ख्रिस गेलचा विक्रम मोडलाय. तर, महेला जयवर्धनेचा विश्वविक्रम मोडण्यासाठी विराट फक्त 27 धावा दूर आहे.
हे देखील वाचा-