Shoaib Akhtar on Team India : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत (T20 World Cup 2022) अगदी रोमहर्षक सामने होताना दिसत आहेत. भारताने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला, मग नेदरलँडलाही मात देत अव्वलस्थान गाठलं आहे. पण पाकिस्तान मात्र आधी भारताकडून मग झिम्बाब्वेकडून पराभूत झाला होत थेट पाचव्या स्थानी गेला आहे. या पाकिस्तानचे पराभव माजी खेळाडू शोएब अख्तरला (Shoaib Akhtar) चांगलेच झोंबले असून त्याने भारतावर निशाणा साधत, 'पाकिस्तान आता स्पर्धेबाहेर जाणार असेल तर भारतही सेमीफायनलपर्यंतच पोहोचेल आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा घरी परतेल,' असं वक्तव्य केलं आहे.

ग्रुप 1 मध्ये गुरुवारी 27 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला आणि ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या या पराभवानंतर अनेक माजी दिग्गज चांगलेच नाराज आहेत. शोएब अख्तरने देखील या पराभवानंतर टीम इंडियाविरुद्ध बोलताना, ''मी आधीच सांगितले आहे की पाकिस्तान या आठवड्यात वर्ल्डकपमधून बाहेर पडेल आणि मग टीम इंडिया पुढील आठवड्यात सेमीफायनलचा सामना खेळून स्पर्धेबाहेर पडेल. भारतही काही खूप भारी संघ नाहीये.'' विशेष म्हणजे भारत सध्यातरी विश्चचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आधी पाकिस्तानला 4 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडवरही भारतने 56 धावांनी विजय मिळवला आहे. आता भारताचा पुढील सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) असणार आहे.

ग्रुप-2 पॉईंट्स टेबल : ग्रुप-2 चा विचार केल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या दोन स्थानांवर आहेत. पाकिस्तानचा संघही टॉपवर असेल असे वाटत होते पण सलग दोन सामने गमावल्यानने ते थेट पाचव्या स्थानावर आहेत. झिम्बाब्वे आणि बांग्लादेशचा संघ तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.

संघ सामने विजय पराभव गुण नेट रन रेट
भारत 2 2 0 4 1.425
दक्षिण आफ्रिका 1 0 3 5.200
झिम्बाब्वे 2 1 0 3 0.050
बांग्लादेश 2 1 1 2 -2.375
पाकिस्तान 2 0 2 0 -0.050
नेदरलँड 2 0 2 0 -1.625

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022 : वर्ल्ड कप सेमीफायनलच्या शर्यतीत कोण-कोण? कोणत्या स्थानी कुठला संघ? पाहा पॉईंट्स टेबल