Team India Practice : भारतीय संघातील स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) हे दोघेही दीर्घ काळानंतर क्रिकेट मैदानावर परतले आहेत. दोघेही आपापल्या संघांसाठी मुख्य गोलंदाज आहेत. नुकतेच हे दोघेही प्रॅक्टीस सेशनमध्ये एकमेंकासोबत चर्चा करताना दिसले. यावेळी शामी शाहीनला काही खास टीप्स देताना दिसत असून दोघांचा हा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेटने (PCB) त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवर नेटकरीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


या व्हिडिओमध्ये शाहीन आफ्रिदी मोहम्मद शामीकडून बोलिंगच्या खास टिप्स घेताना दिसत आहे. शामी त्याला त्याच्या बोलिंग संबंधित काही खास गोष्टी सांगत असून यावेळी बोलिंग करताना चेंडू रिलीज कसा करायचा याबद्दलची अॅक्शन शमी करताना दिसत आहे. यादरम्यान मोहम्मद शमी पाकिस्तानच्या इतर खेळाडूंनाही भेटतो. 






23 ऑक्टोबरला महामुकाबला


T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. या सामन्याने दोन्ही संघ आपल्या वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात करतील. या दोन्ही संघांमधील गेल्या वर्षभरातील हा चौथा सामना असेल. गेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानने दोनदा, तर भारतीय संघाने एकदा विजय मिळवला आहे.


कसे आहेत दोन्ही संघ?


टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी.


टीम पाकिस्तान


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद.


हे देखील वाचा-