World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक (World Cup) स्पर्धेचं यंदाच यजमानपद भारताकडे आहे. त्यासाठी या स्पर्धेचं वेळापत्रक देखील आयसीसीकडून (ICC) जाहीर करण्यात आलं आहे. परंतु विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानने भारतात (India) येण्यास तयार नसल्याचं आता समोर येत आहे. यासंदर्भात आशियाई क्रिकेट परिषद आणि आयसीसी यांना पाकिस्तानने (Pakistan) पत्र देखील लिहिले आहे. आशिया कपसाठी भारत जर पाकिस्तानमध्ये येणार नसेल तर पाकिस्तानही विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही अशी भूमिका आता पाकिस्तानने घेतली आहे. 


पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान मजारी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी जसं भारतीय संघाने (Indian Cricket Team) आशिया कपसाठी  तटस्थ ठिकाणाची मागणी केली आहे, तसंच आम्ही देखील विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. एहसान मजारी यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हटलं की, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या अखत्यारीत येते. त्यामुळे आशिया चषकासाठी तटस्थ ठिकाणीची मागणी केली आहे, तर आम्ही देखील विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही.' 


एहसान मजारी यांनी पुढे बोलतांना म्हटलं की, 'त्यांना अहमदाबादमध्ये खेळण्यास काही अडचण नाही. पण त्यासाठी भारताने देखील आशिया चषकासाठी पाकिस्तानात येऊन खेळायला हवे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी विश्वचषकातील  पाकिस्तानच्या सहभागासाठी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.' 


या समितीविषयी बोलतांना पाकिस्तानच्या क्राडामंत्र्यांनी म्हटलं की, 'या समितीचे प्रमुख परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो हे असणार आहेत. तसेच इतर  11 मंत्री या समितीचा भाग असणार आहेत आणि त्यामध्ये मी देखील आहे. '


याशिवाय आशिया चषक 2023 साठी आपण हायब्रीड मॉडेलचे समर्थन करत नसल्याचं एहसान मजारी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानकडे यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद आहे. त्यामुळे पाकिस्तानला पाकिस्तानातच सर्व क्रिकेटचे सामने आयोजित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेलचं समर्थन करत नाही. 


5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर  यादरम्यान विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. पाकिस्तानने चेन्नई आणि बेंगलोर येथे होणाऱ्या सामन्यावर आक्षेप घेत ठिकाणं बदलण्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तानविरोधात चेन्नईमध्ये आणि बेंगलोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे.15 ऑक्टोबर रोजी भारताविरोधात अहमदाबादमध्ये, 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात बेंगलोर आणि 23 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरोधात चेन्नई येथे पाकिस्तानचे सामने होणार आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान या हे सामने खेळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा : 


India Richest Cricketer : तेंडुलकर, कोहली किंवा धोनी नाही, 'ही' व्यक्ती भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू