India Richest Cricketer : क्रिकेट (Cricket) हा जगातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारतातही (India) क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, युवराज सिंह, रोहित शर्मा यासारख्या खेळाडूंचा वेगळा चाहतावर्ग आहे. या खेळाडूंकडे अफाट संपत्ती आहे. हे खेळाडू क्रिकेटमधूनच नाही, तर व्यवसाय, मॉडेलिंग आणि जाहिराती अशा विविध पद्धतीने कोट्यवधींची कमाई करतात. सोशल मीडिया पोस्टवरूनही हे खेळाडू कमाई करतात. पण यापैकी एकही खेळाडू भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर नाही. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे.


भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण?


भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर म्हटल्यावर सचिन तेंडुलकर, धोनी किंवा विराट कोहली यांचा विचार तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. पण तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर या तिघांपैकी नसून वेगळीच व्यक्ती आहे. भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी नसून गुजरातचा एक फलंदाज आहे. हा श्रीमंत क्रिकेटर कोण आणि त्यांची एकूण संपत्ती किती जाणून घ्या.


सचिन तेंडुलकर आणि धोनीची संपत्ती


भारताचा माजी सलामीवीर भारतरत्न सचिन तेंडुलकरची संपत्ती 1,250 कोटी रुपये आहे, तर माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीची एकूण संपत्ती 1,040 कोटी रुपये आहे. सचिन तेंडुलकर आणि धोनीचे अनेक व्यवसायही आहेत, ज्यामधून त्यांना उत्पन्न मिळतं.


विराट कोहलीची संपत्ती


अलीकडेच विराट कोहलीची संपत्ती 1000 कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे विराट कोहली सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विराट कोहली बीसीसीआयच्या कराराच्या "A+" यादीत आहे. विराटला वार्षिक 7 कोटी मिळतात. तो कसोटीसाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये घेतो. त्याशिवाय, आयपीएल फ्रँचायझी आरसीबीकडून त्याची वार्षिक 15 कोटी रुपयांची कमाई होते


भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण?


विराट कोहली, धोनी किंवा सचिन तेंडुलकर नाही, तर समरजितसिंह रणजितसिंह गायकवाड भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, समरजितसिंह रणजितसिंह गायकवाड हे क्रिकेट खेळणारे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. समरजितसिंह गायकवाड हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. समरजित सिंह गायकवाड हे गुजरातमधील बडोद्याचे माजी राजे आहेत. त्यांचा जन्म 25 एप्रिल 1967 रोजी झाला. समरजितसिंह गायकवाड हे रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड आणि शुभांगिनी राजे यांचे एकुलते एक पुत्र आहेत. 


समरजितसिंह गायकवाड यांची संपत्ती


वडीलांच्या निधनानंतर मे 2012 मध्ये समरजित सिंह गायकवाड यांचा महाराजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना वारसाहक्काने 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती मिळाली आहे. जगातील सर्वात मोठं खाजगी निवासस्थान असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसचेही ते मालक आहेत. गुजरात आणि बनारस, उत्तर प्रदेशमध्ये 17 मंदिरे चालवणाऱ्या मंदिर ट्रस्टवरही त्यांच्या मालकीत आहेत. समरजितसिंह गायकवाड यांचा विवाह राधिकाराजे यांच्याशी झाला आहे. त्या वांकानेर राज्यातील राजघराण्यातील आहेत.


समरजितसिंह गायकवाड रणजी खेळाडू


समरजीतसिंह गायकवाड यांनी रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व केलं आणि सलामीच्या फळीतील फलंदाज म्हणून सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यांनी बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.