T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात आयर्लंडचा (New Zealand vs Ireland) वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिलनं (Joshua Little) खास विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात हॅट्ट्रीक घेऊन जोशु्आनं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली, कागिसो रबाडा आणि वानिंदु हसरंगा यांसारख्या दिग्गज गोलंदाजाच्या यादीत समावेश केलाय. यंदाच्या टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रीक घेणारा दुसरा तर जगातील सहावा गोलंदाज ठरला आहे.यूएईच्या कार्तिक मय्यपननं श्रीलंकेविरुद्ध टी-20 विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रीक घेतली होती.


न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात आज टी-20 विश्वचषकातील 37वा सामना खेळला जातोय. दरम्यान, न्यूझीलंडच्या डावातील 19 व्या षटकातील आयर्लंडकडून जोशुआ लिटिल गोलंदाजीसाठी आला. त्यानं या षटकात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, जेम्श नीशम आणि मिचेल सँटनरचा विकेट्स घेऊन यंदाच्या टी-20 विश्वचषकातील दुसरी हॅट्ट्रीक घेतलीय.


हॅट्ट्रीकचा व्हिडिओ-






 


टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रीक घेणारा सहावा गोलंदाज
ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं 2007 च्या टी-20 विश्वचषकात पहिल्यांदा हॅट्ट्रीक घेतली होती. महत्वाचं म्हणजे, मागच्या टी-20 विश्वचषकात तीन गोलंदाजांनी हॅट्रीक घेतली.आयर्लंडचा वेगवान गोलंदाज कर्टिस कॅम्पफरनं नेदरलँड्सविरुद्ध ही कामगिरी केलीय.त्यानंतर श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं इंग्लंडविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली.यंदाच्या टी-20 विश्वचषकात यूएईच्या कार्तिक मय्यपननं श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रीक घेऊन इतिहास रचला होता. त्यानंतर जोशुआ लिटिलनं न्यूझीलंडविरुद्ध हॅट्ट्रीक घेतलीय.


हे देखील वाचा-