T20 World Cup 2022 Match Live Streaming : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धा सुरु असून आज स्पर्धेत ग्रुप 1 मध्ये महत्त्वाचे सामने रंगणार आहेत. सेमीफायनलपूर्वी केवळ 6 सामने राहिले असून अजून कोणताच संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला नाही. पण आज होणाऱ्या दोन सामन्यातून आपल्याला सेमीफायनलमध्ये एन्ट्री करणारे संघ काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकतात. ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका या संघामध्ये सेमीफायनलची शर्यत आहे. दुसरीकडे आयर्लंड, अफगाणिस्तान यांचं आव्हान संपलं आहे. त्यात न्यूझीलंड सर्वाधिक नेटरनरेटने अव्वल स्थानावर आहे. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे गुण प्रत्येकी 5 आहेत. पण आज न्यूझीलंड आयर्लंडला मात देऊन 7 गुण करु शकते आणि नेटरननेरट इतरांपेक्षा खूप असल्याने जवळपास आपलं स्थान सेमीफायनलमध्ये निश्चित करु शकते. तसंच ऑस्ट्रेलियाही अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने मात देऊन सेमीफायनलमध्ये जागा सुरक्षित करण्यात्या प्रयत्नात असेल. तर आज पार पडणाऱ्या सामन्यांबद्दलची माहिती जाणून घेऊ...

कोणा-कोणाचे आहेत सामने?

आज दोन सामने खेळवले जाणार असून पहिला न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान असा रंगणार आहे.

कधी होणार सामने?

भारतीय वेळेनुसार दिवसातील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड सकाळी 9.30 वाजता तर दुसरा ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.  

कुठे आहेत सामने?

आजचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल या क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कशी आहे ग्रुप 1 ची गुणतालिका?

सुपर-12 ग्रुप 1

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 4 2 1 1 5 +2.233
2 इंग्लंड 4 2 1 1 5 +0.547
3 ऑस्ट्रेलिया 4 2 1 1 5 -0.304
4 श्रीलंका 4 2 2 0 4 -0.457
5 आयर्लंड 4 2 1 0 2 1.544
6 अफगाणिस्तान 4 0 2 2 2 -0.718

हे देखील वाचा-