Melbourne Cricket Ground Video : टी20 विश्वचषक 2022 चा थरार (T20 World Cup 2022) 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीत रंगणार आहे. आधी राऊंड 1 चे सामने खेळवले जातील, ज्यात  8 संघापैकी 4 संघ सुपर-12 मध्ये जागा मिळवण्यासाठी लढतील. दरम्यान भारत आधीच सुपर 12 मध्ये असून भारताची पहिली लढत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. दरम्यान या हायवोल्टेज सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड तयार केलं जात आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचा हाच खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, '9 दिवसांपूर्वी याठिकाणी शेवटचा फुटबॉल सामना आयोजित केला होता. आता ग्राऊंड पुन्हा तयार होत आहे.'  या कॅप्शनपुढे बॅट आणि बॉलचा इमोजीही जोडला गेला आहे. त्यानुसार ग्राऊंड क्रिकेट सामन्यांसाठी रेडी होत असल्याचं दिसून येत आहे. टाईम-लॅप्स पद्धतीने हा व्हिडीओ तयार केला आहे.


पाहा VIDEO






ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळत आहे. "एक महिन्यानंतर सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झालीय. दरम्यान, 16 आंतरराष्ट्रीय संघातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी 82 देशांतील क्रिकेटप्रेमींनी तिकीटं विकत घेतली आहेत", अशीही माहिती आयसीसीनं दिलीय.


टी-20 विश्वचषकाचा थरार पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उस्तुकता


"भारत आणि अ गटातील  रनर-अप संघ यांच्यातील सुपर-12 फेरीच्या सामन्यांचीही सर्व तिकिटं विकली गेली आहेत. यासोबतच दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झालीय. मात्र, या सामन्यांसाठी आणखी काही तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सुपर-12 फेरीच्या सुरुवातीच्या सामन्यांची (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका)  जवळपास सर्व तिकिटं विकली गेली आहेत. या सामन्यांची फारच कमी तिकिटं शिल्लक आहेत", असंही आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.


हे देखील वाचा-