Team India for ICC T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरु होणार आहे. यासाठी बीसीसीआयनं नुकताचं भारतीय संघ जाहीर केला आहे. संघामध्ये भारताचा स्टार अष्टपैलू आणि सध्या कमाल फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पंड्याचाही (Hardik Pandya) समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे बराच काळ खराब फॉर्ममध्ये राहिलेल्या हार्दिकनं आयपीएल 2022 मध्ये गुजरात संघाचा कर्णधार होत संघाला जेतेपद मिळवून दिलंच पण सोबतच भारतीय संघातही यशस्वी पुनरागमन केलं आहे. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकात तो संघासाठी गेमचेन्जर ठरु शकतो. कारण हार्दीकमध्ये एकट्याच्या जीवावर सामना जिंकवून देण्याची ताकद आहे. त्यात तो कमाल फॉर्मात असल्याने आतातर तो संघासाठी हुकूमी एक्का आहे.


नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपमध्ये  (Asia Cup 2022) हार्दिक पंड्या संघात होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी कामगिरी केली होती. सामन्यात 33 धावा करण्यासोबतच हार्दिकने 3 विकेट्सही घेत सामनावीराचा मान मिळवला. यापूर्वी त्याने मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धही त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. यानंतर त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातही चमकदार कामगिरी केली. त्यामुळे सध्यातरी हार्दिक अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये अगदी फिक्स झाला आहे.


हार्दिकची कारकिर्द


हार्दिकच्या कारकिर्दीचा विचार करता तो कायमच एक महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 70 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 884 धावा केल्या आहेत. यादरम्यान हार्दिकने 61 चौकार आणि 48 षटकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 54 विकेट्सही घेतल्या आहेत. पंड्याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे. वनडे फॉरमॅटचा रेकॉर्ड बघितला तर त्याने 66 मॅचमध्ये 1386 धावा केल्या आहेत. यासह 63 विकेट्स घेतल्या आहेत.


T20 World Cup साठी भारतीय संघ जाहीर


टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहेत. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया...


टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.


राखीव खेळाडू


मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर


हे देखील वाचा-