Hazratullah Zazai Ruled Out From T20WC 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तान संघाचा स्फोटक सलामीवीर हजरतुल्ला झझाई (Hazratullah Zazai) दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. निम्म्याहून अधिक स्पर्धा अजून शिल्लक असताना हसरतुल्ला संघाबाहेर गेल्याने अफगाणिस्तान संघाला मोठा तोटा झाला आहे.


अफगाणिस्तानचा स्फोटक सलामीवीर हजरतुल्ला झझाई सध्या पोट आणि किडनीच्या आजाराशी झुंज देत आहे. या समस्येमुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे हजरतुल्ला हा टी-20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. डेहराडून स्टेडियमवर 2019 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या T20 सामन्यात त्याने 162 धावा करत तुफानी शतक झळकावलं होतं.


अफगाणिस्तान संघात गुलबदिनचा समावेश 


हजरतुल्ला दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर गुलबदिन नायबचा अफगाणिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. नायब सध्या अफगाणिस्तान संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे. पण
गेल्या एक वर्षापासून तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, त्यामुळे त्याला या विश्वचषकात अंतिम 11 मध्ये संधी मिळाल्यास त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. नायब हा अफगाणिस्तानच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे, त्यामुळे संघाला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. 


अफगाणिस्तानची सुमार कामगिरी


T20 विश्वचषकात अफगाणिस्तान संघाला मंगळवारी ब्रिस्बेनमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे. त्यानंतर शुक्रवारी त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळायचा आहे. अफगाणिस्तान संघाच्या यंदाच्या विश्वचषकातील कामगिरीवर नजर टाकली तर त्यांनी आतापर्यंत खास कामगिरी केलेली नाही. त्यांनी विश्वचषकात एकही सामना जिंकलेला नाही. पण विशेष म्हणजे त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द होऊन त्यांना गुण मिळाले आहेत.


बदल झाल्यानंतरचा अफगानिस्तानी संघ


मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह ज़दरान, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), अजमतुल्लाह ओमरजई, दरवेश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, गुलबदिन नायब, इब्राहिम जदरान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, कैस अहमद, खान, सलीम सफी, उस्मान गनी.


राखीव खेळाडू: अफसर झझाई, शराफुद्दीन अश्रफ, रहमत शाह, 


हे देखील वाचा-