India vs Bangladesh, Adelaide Weather Report : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतीय संघाचा आगामी सामना बांग्लादेशविरुद्ध (India vs Bangladesh) बुधवारी (2 नोव्हेंबर) रोजी खेळवला जाणार आहे. भारताने विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तान, नेदरलँड यांना मात देत केली असली तरी रविवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभवामुळे भारताची विश्वचषकातील स्थिती काहीश अवघड झाली आहे. ज्यामुळे भारताला आता बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. पण या महत्त्वपूर्ण सामन्यात जर पाऊस झाला तर भारताला तोटो होऊ शकतो. कारण सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघाना 1-1 गुण मिळेल, ज्यामुळे भारत स्प्धेत अधिक आघाडी घेऊ शकणार नाही.


भारत आणि बांग्लादेश हे संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये आमनेसामने येणार आहेत. अॅडलेडची खेळपट्टी फलंदाजीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. दरम्यान दोन्ही संघासाठी चांगली आघाडी घेऊन सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊस टाकण्याकरता हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. पण याच महत्त्वाच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास दोन्ही संघाना तोटा होऊ शकतो. तर नेमकी अॅडलेडची बुधवारची हवामानाची स्थिती कशी असेल? याबद्दल जाणून घेऊ... तर हवामान खात्यानुसार, सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची तब्बल 95 टक्के शक्यता आहे. याशिवाय 25-30 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने वारे वाहतील. दरम्यान पावसाची दाट शक्यता असल्याने क्रिकेट रसिक नाराज असून भारतासाठी हा सामना रद्द झाल्यास पुढे पोहोचणे अवघड होणार आहे.


पावसाने सामना रद्द झाल्यास काय?


टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना  गुण वाटून दिले जातील.


कशी असू शकतो दोन्ही संघाची संभाव्य 11?


संभाव्य भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह


संभाव्य बांग्लादेशचा संघ  


नजमुल हुसैन शान्तो, सौम्या सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसादेक हुसैन, नूरुल हसन (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्कीन अहमद



हे देखील वाचा-


T20 World Cup 2022 : जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार?