Jasprit Bumrah T20 World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. होय... भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं तसे संकेत दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरव गांगुलीनं जसप्रीत बुमराहबाबत आशा कायम आहेत. तो विश्वचषकात खेळू शकतो, असे वक्तव्य केले आहे.
विश्वचषकाला दोन ते तीन आठड्याचा कालावधी राहिला आहे. त्यापूर्वीच जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याची चर्चा माध्यमात रंगली. बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं प्रसारमाध्यमांनी जसप्रीत बुमराह विश्वचषकाबाहेर गेल्याचं वृत्त दिलं. पण शुक्रवारी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं या वृत्ताचं खडंन करत बुमराहच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा कायम असल्याचे संकेत दिले.
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. त्याशिवाय त्याची दुखापत लवकर बरी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच बीसीसीआयनं अद्याप जसप्रीत बुमराहच्या बदली गोलंदाजाचं नाव जाहीर केले नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह अद्याप विश्वचषकात खेळण्याची आशा कायम असल्याचं वृत्त आहे.
जसप्रीत बुमराह सध्या बेंगळुरुमधील NCA मध्ये फिटनेसवर काम करत आहे. एनसीएमध्ये त्याच्या फिटनेसवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे. मेडिकल टीम जसप्रीत बुमराहच्या फिटनेस चाचण्या आणि स्कॅन घेऊन त्यावर काम करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह पाच ऑक्टोबर रोजी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता कमी आहे. पण जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला तर नंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निवड समितीकडून जसप्रीत बुमराच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यास येत नाही.
जसप्रीत बुमराहची दुखापत चिंता वाढवणारी
भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळं संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावं लागलंय. त्यानंतर आता जसप्रीत बुमराहच्या दुखपतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. बीसीसीआयमधील सुत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह विश्वचषक खेळण्याची शक्यता नाही. बुमराहच्या दुखापतीनं भारताच्या चिंतेत भर पडली आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.