Jasprit Bumrah's Tweet Viral : भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा आघाडीचा गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah). मागील काही वर्षात आपल्या भेदक गोलंदाजीने संघाचा सर्वात विश्वासू गोलंदाज झालेला बुमराह आता मात्र दुखापतीचा सामना करत आहे. आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा तोंडावर आली असताना बुमराहला पाठीची दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण या साऱ्या चर्चेदरम्यान बुमराहचं जवळपास 5 वर्षांपूर्वीचं म्हणजेच 2017 सालचा एक ट्वीट व्हायरल होत आहे.
बुमराहने 28 ऑगस्ट, 2017 रोजी त्याच्या अधिकृत ट्वीटरवरुन त्याचा एक मैदानातील टीम इंडियाच्या जर्सीतील पाठम्होरा फोटो पोस्ट केला आहे. याला त्याने एक दमदार असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्याने 'The comeback is always greater than the setback' असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे या फोटोतून बुमराह 'पुनरागमन हे माघार घेण्यापेक्षा कधीही भारीच,' असं म्हणत आहे. आता दुखापतीमुळे अडचणीत असलेल्या बुमराहचं हे ट्वीट चाहते व्हायरल करत असून यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. तसंच बुमराह लवकरच पुनरागमन करेल अशी आशाही व्यक्त करत आहेत.
इंग्लंडविरुद्ध दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला बुमराह आशिया कपही खेळू शकला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी20 सामने तो खेळला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सराव करताना जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली, ज्यामुळं संघ व्यवस्थापनानं बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो गुरुवारी (29 सप्टेंबर)समोर आलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळणार नसल्याचं पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं.
बुमराहची दुखापत चिंता वाढवणारी
भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळं संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावं लागलंय. त्यानंतर आता जसप्रीत बुमराहच्या दुखपतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. बीसीसीआयमधील सुत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह विश्वचषक खेळण्याची शक्यता नाही. बुमराहच्या दुखापतीनं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. कारण आधी रवींद्र जाडेजा त्यानंतर आता जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडलाय.
हे देखील वाचा-