IND vs PAK, WT20: बिस्मा मारूफ हिने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. बिस्मा मारूफने मोक्याच्या क्षणी संयमी आणि तितकीच आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानची धावसंख्या वाढवली.. बिस्मा मारूफ आणि आयशा नसीम यांच्या अर्धशतकी भागादारीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 20 षटकांत 149  धावांपर्यंत मजल मारली. भारताला विजयासाठी निर्धारित 20 षटकांत 150 धावांचं लक्ष दिले आहे. 


पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफ हिने कर्मधाराला साजेशी फलंदाजी केली.  बिस्मा मारूफ हिने 55 चेंडूत सात चौकारांसह 68 धावांची खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना बिस्मा हिने दुसरी बाजू लावून धरली. बिस्मा मारूफ आणि आयशा नसीम या दोघींपुढे भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकले. दोघींनी 47 चेंडूत नाबाद 81 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर पाकिस्तानचा संघ 149 धावांपर्यंत पोहचला. आयशा नसीम हिने 25 चेंडूत झटपट 43 धावांची खेळी केली. भारताकडून राधा यादव हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकर यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला. यांच्याशिवाय इतर गोलंदाजांनाही एकही बळी घेता आला नाही.




नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने -
पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफ हिने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  स्मृती मंधानाच्या अनुपस्थितीत भारतीय संघ मैदानात उतरला आहे.  भारताच्या फिल्डर्सनी सोपे झेल सोडत पाकिस्तानच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली, परिणामी आयशा आणि मारुफ यांनी अर्धशतकी भागिदारी केली. आयशा नसीम हिला दोन वेळा जीवदान मिळाले, याचा तिने पुरेपूर फायदा केला. 


पाकिस्तानची प्लेईंग 11 -
जावेरिया खान, मुनीबा अली (विकेटकीपर), बिस्माह मारूफ (कप्तान), निदा डार, सिदरा अमीन, आलिया रियाज, आयशा नसीम, ​​फातिमा सना, ऐमन अनवर, नशरा संधू, सादिया इकबाल


भारताची प्लेईंग 11 - 
शफाली वर्मा, यस्तिका भाटिया,  जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकिपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर, राधा यादव,राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह