India vs Pakistan : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला मात देत विजयी सुरुवात केली आहे. नुकताच पार पडलेला भारत पाकिस्तान सामना कमालीचा चुर व्शीयाचा राहिला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात भारत 4 विकेट्सनी विजयी झाला, ज्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत होता. सर्वच सोशल मीडियावर भारतीय संघ, विराट कोहली, अर्शदीप सिंह अशा साऱ्यांच्या नावाचा जयघोष सुरु होता. पण पाकिस्तानी चाहत्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसून आला, दरम्यान अखेरच्या षटकातील एक नो बॉल पाकिस्तान चाहत्यांच्या अत्यंत जिव्हारी लागला असून तो नो बॉल नव्हताच असं अनेक नेटकरी म्हणत असून त्यामळेच #Noball हे ट्वीटर ट्रेण्डमध्येही दिसून येत आहे.



नेमकं काय घडलं?


तर भारतीय संघ सामना गमावणार असंच जवळपास वाटत होतं. कारण निर्धारीत रनरेट हा अखेरच्या काही षटकात फारच वाढलेला दिसून येत होतं, त्या पाकिस्तानचे गोलंदाजही भेदक गोलंदाजी करताना दिसून येत होते. पण 19 व्या षटकात आलेल्या दोन सिक्सेसनी भारताच्या बाजून सामना झुकेल अशा आशा पल्लवीत झाल्या. ज्यानंतर अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. पण पहिल्याच बॉलवर पांड्या बाद झाला. मग क्रिजवर आलेल्या कार्तिकनं एक रन घेतली. त्यानंतर कोहलीनं 2 रन घेतले. ज्यानंतरचा चौथा बॉल मात्र सामना फिरवणारा ठरला, मोहम्मद नवाजने टाकलेला हा बॉल कोहलीने थेट षटकारांसाठी उचलला आणि हाच चेंडू अंपायरने नो बॉल म्हणून घोषित केला., ज्यानंतर मात्र पाकिस्तानी खेळाडू नाराज झाले होते. दुसरीकडे भारताला फ्रि हीट मिळाली, मग एका वाईड चेंडूनंतर पुढच्या चेंडूवर कोहली त्रिफळाचीत झाला पण फ्रि हीट असल्यानं तो बाद झाला नाही उलट भारताने तीन रन्स घेतले. ज्यामुळे सामना भारताच्या बाजूने साफ झुकल्यांचं दिसून आलं. पाचव्या चेंडूवर कार्तिक आऊट झाला पण आश्विननं प्रसंगवधान राखत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान याच षटकातील पंचानी दिलेला नो बॉल नो बॉल नसून योग्य डिलेव्हरी होती, तसंच नो बॉल रिव्ह्यूय व्हायला हवा होता, अशाही प्रतिक्रिया देत पाकिस्तानचे चाहते ट्वीटरवर विविध ट्वीट करत आहेत...












 


हे देखील वाचा-


Hardik Pandya Emotional : ''आमच्यासाठी आई बापाने घर सोडलं,स्वप्न सोडलं,भर मैदानात पांड्या ढसाढसा रडला'', VIDEO