Hardik Pandya Emotional : भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) टी20 विश्वचषक सामन्यात भारतानं 4 विकेट्सनी विजय मिळवला असून या सामन्यात हार्दिक पांड्यानं बॉल आणि बॅट दोन्हीने कमाल केल्याचं पाहायला मिळालं. आधी गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्यातर फलंदाजीत महत्त्वूपूर्ण 40 रन केले. पण या विजयानंतर मात्र हार्दिक कमालीचा भावूक झाल्याचं दिसला. हालाखीच्या परिस्थितीतून इथवर आलेल्या हार्दिकला या विजयानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आठवली आणि मग काय तो मैदानातच ढसाढसा रडला.
यावेळी रडताना हार्दिकने त्याच्या घरच्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आणि केलेल्या बलिदानाची आठवण केली. त्याच्यासाठी ते एका शहरातून दुसरीकडे गेले. तो स्वत:ही एक बाप आहे मुलावर खूप प्रेम करतो पण घरातल्यांनी केलेलं बलिदान खूप मोठं होतं असं पांड्या व्हिडीओत म्हणाला.
पाहा VIDEO-
काय आहे हार्दिकची कहाणी?
हार्दिकच्या प्रवासाचा विचार केला तर सर्वात आधी त्याच्या बालपणीबद्दलचा विचार येतो. एका मुलाखतीत हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल मॅगी खाऊनही दिवस काढत असल्याचं हार्दिकनं सांगितलं होतं. त्यावरुन त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. 11 ऑक्टोबर, 1993 रोजी गुजरातच्या सुरतमध्ये जन्माला आलेला हार्दिक मोठा भाऊ कृणालसोबत बालपणीपासून क्रिकेटचे धडे गिरवत होता. घरची परिस्थिती त्यावेळी तशी चांगलीच होती. वडिलांचा गाड्यांचा बिझीनेस चांगला चालला होता. पण मुलांच्या क्रिकेटसाठी ते सुरतहून बडोद्याला शिफ्ट झाले ज्यानंतर त्यांचा बसा-बसवलेला व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. घरची परिस्थिती हलाखीची झाली दोन वेळच्या जेवनासाठीही संघर्ष सुरु झाला. पण या सर्वातही हार्दिकनं क्रिकेट सोडलं नाही आणि आज याच मेहनतीच्या आणि घरच्यांच्या सपोर्टच्या जोरावर जगातील स्टार ऑलराऊंडर म्हणून उभा आहे.
कोहली-पांड्याची विक्रमी भागिदारी
भारत 159 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला आणि सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी 4 धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर सूर्यकुमारही 15 धावा करुन बाद झाला. मग अक्षर 2 धावांवर धावचीत झाला आणि 50 धावांच्या आतच भारताचे 4 गडी तंबूत परतले. त्यानंतर मात्र विराट आणि पांड्या यांनी एकहाती डाव सावरत एक तगडी भागिदारी उभारली. दोघांनी मिळून 113 रनांची विक्रमी भागिदारी केली, ज्यानंतर 40 रनामवर पांड्या बाद झाला. सामन्याचा सामनावीर विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली आणि भारताला विजयश्री मिळवून दिला. विशेष म्हणजे भारताने टी20 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.
हे देखील वाचा-