IND vs NZ, World Cup 2023 : आज धर्मशालेत (Dharmshala) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सामना रंगणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामना धर्मशाला स्टेडिअम (Dharmshala Stadium) वर दुपारी 2 वाजता पार पडणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी धर्मशालेत पूजा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने आजच्या सामन्याच्या आधी पूजा केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी धर्मशालेत पूजापाठ
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या आधी भगवान इंद्रूनाग पूजा केली आहे. या पूजेचं आयोजन धर्माशालेतील एका पौराणिक मंदिरात करण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन प्रीमियर लीगचे चेअरमन अरुण धूमल यांनीही या पूजेला उपस्थिती लावली. अरुण धूमल यांनी सांगितलं की, आम्ही पहिली पूजा येथे (धर्मशाला मैदान) केली आहे आणि दुसरी पूजा मंदिरामध्ये होणार आहे.
सामन्यावर पावसाचं सावट
महत्त्वाचं म्हणजे विश्वचषकासाठी धर्मशाला स्टेडिअमवर टी इंडियाचा हा पहिला सामना आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडिअम (Himachal Pradesh Cricket Stadium) मैदानावर दोन्ही संघ आपापसांत भिडणार आहेत. मात्र, चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब म्हणजे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट (Rain Prediction) आहे. आजच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. अॅक्यू वेचरच्या रिपोर्टनुसार, धर्मशालेत पाऊस पडण्याची (Dharamshala Weather Update) शक्यता 40 टक्के आहे.
पाऊस पडल्यास सामन्यावर परिणाम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. सामन्यावर पावसाचा लक्षणीय परिणाम झाल्यास, षटके कमी केली जाऊ शकतात. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. धर्मशाला येथे यापूर्वी झालेल्या सामन्यादरम्यान पाऊस पडला होता. शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात झाला. या सामन्यावरही पावसापरिणाम झाला. त्यामुळे षटके 43 षटकांपर्यंत कमी करण्यात आली.
भारत आणि न्यूझीलंडच्या संघांनी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. दोन्ही संघानी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. दोन्ही संघांकडे प्रत्येकी 8-8 गुण आहेत. न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जास्त रन रेटमुळे न्यूझीलंड अव्वल क्रमांकावर आहे.