IND vs NZ : विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा मध्ये आज यजमान भारत (Team India) आणि गतविजेता न्यूझीलंड (New Zealand) संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत. धर्मशाला येथील स्टेडिअम (Dhramshala Stadium) वर हा सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात रोहित उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. रोहित शर्माला त्याचा दमदार फॉर्म कायम ठेवणं गरजेचं आहे. कर्णधार रोहित शर्मा नव्या विक्रमाला गवसणी घालण्यापासून अवघे काही पाऊलं दूर आहे. रोहित शर्मा या सामन्यात आणखी एक दमदार विक्रम आपल्या नावे करू शकतो, यासाठी त्याला एक दमदार खेळीची आवश्यकता आहे.


'हिटमॅन' नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज!


रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावांचा टप्पा गाठण्याचा  (Rohit Sharma Record) विक्रम रचू शकतो. यासाठी त्याला फक्त 93 धावांची गरज आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 66.25 च्या रनरेटने 265 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 17907 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 93 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 18000 धावा पूर्ण होतील. असे केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा गाठणारा रोहित शर्मा 20 वा फलंदाज ठरणार आहे.






भारत विरुद्ध न्यूझीलंड


विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपले पाय भक्कम रोवण्याच्या दृष्टीने आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं आहं. टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सलग चार विजय मिळवल्यानंतर आजच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे चारही सामने जिंकले असून दोन्ही संघांकडे समान आठ गुण आहेत.


टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले आहेत. विश्वचषक 2023 गुणतालिकेत भारतीय संघ 8 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. कोणत्याही संघाला उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी सात सामने जिंकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आता उपांत्य फेरी गाठण्यापासून फक्त 3 सामन्यात विजय मिळवण्याची आवश्यकता आहे. जर भारताने 5 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले तर नेट रन रेटच्या आधारे टीम इंडिया उपांत्य फेरी गाठू शकेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs NZ : दुखापतीमुळे पंड्या सामन्याबाहेर, 'या' खेळाडूला संधी; शार्दूलही प्लेईंग 11 च्या बाहेर?