India vs New Zealand 3rd T20 : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 आणि एकदिवसीय मालिका भारत खेळत आहे. अशामध्ये नुकतीच टी20 मालिका संपली असून मालिकेतील तिसरा सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला संपूर्ण 20 ओव्हर खेळता आल्या नाहीत. 9 ओव्हरमध्ये 75 रन करु शकला, ज्यानंतर अखेर डीएलएस अर्थात डकवर्थ लुईस मेथडनुसार (DLS Method) निकाल काढण्यात आला आणि हा सामना सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडनं 160 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर भारताची  फलंदाजीची सुरुवात खराब झाली. 4 गडी स्वस्तात बाद झाले. पण 9 व्या षटकात पाऊस आला आणि सामना थांबवण्यात आला.


संपूर्ण सामन्याचा विचार करता नाणेफेक (Toss Update) जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने (Team India) भेदक गोलंदाजीने सुरुवात करत न्यूझीलंडचे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सनं संयमी तसंच फटकेबाजीने सुरुवात करत संघाचा डाव सावरला. दोघांनी संघाची धावसंख्या 100 पार पोहोचवली. दोघांनीही अर्धशतकं ठोकली असून डेवॉन कॉन्वेने 59 आणि ग्लेन फिलिप्सनं 54 धावा केल्या. त्यानंतरचे फलंदाज मात्र अगदी पटापट बाद होत गेले. नीशाम, मिल्ने आणि ईश सोधी हेतर शून्यावर बाद झाले. भारताच्या अर्शदीप सिंहनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सिराजनंही 4 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलनही एक विकेट घेतली.


161 धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. ईशान किशन 10, ऋषभ पंत 11 आणि सूर्यकुमार 13 धावा करुन तंबूत परतले. श्रेयस अय्यरतर खातंही खोलू शकला नाही. मग कर्णधार हार्दिकनं काहीशी फटकेबाजी करत 18 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या, दीपक हुडानंही नाबाद 9 धावा केल्या, ज्यामुळे 9 ओव्हरमध्ये भारतानं 75 रन केले. ज्यानंतर पाऊस आला आणि सामना थांबवला, अखेर काही वेळानंतर डीएलएस मेथडनं निकल काढण्यात आला आणि सामना बरोबरीत सुटला. पण मालिकेतील दुसरा सामना भारतानं जिंकला होता, तर पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला असल्याने अखेर मालिका भारताने 1-0 ने जिंकली आहे.






DLS वापरुनही सामना TIE


विशेष म्हणजे डीएलएस मेथडनं शक्यतो सामना अनिर्णीत सुटत नाही, पण आजचा सामना बरोबरीत सुटला असून विशेष म्हणजे इतिहासातील हा तिसराच असा डीएलएसनुसार अनिर्णीत सुटलेला सामना आहे. याआधी 2021 मध्ये नेदरलँड विरुद्ध मलेशिया आणि माल्ता विरुद्ध गिब्रल्टार असे दोन सामना डीएलएस मेथड वापरुनही अनिर्णीत सुटले होते. 



हे देखील वाचा