T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत अगदी रंगतदार सामने होताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या सुपर 12 फेरीच्या सलामीच्या सामन्यात मागील वेळीचा विश्चचषक विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ 89 धावांनी न्यूझीलंडकडून पराभूत झाला आहे. सामन्यात न्यूझीलंडने दमदार फलंदाजी आणि मग भेदक गोलंदाजी दाखवत विजय मिळवला आहे. यावेळी न्यूझीलंडने आधी डेवॉन कॉन्वेच्या नाबाद 92 धावांच्या जोरावर 200 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आणि मग साऊदी, सँटनर जोडीच्या गोलंदाजीच्या मदतीने 111 धावांवर ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केलं.






सुपर 12 फेरीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने अप्रतिम खेळ दाखवाला. आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर मात्र सलामीवीरांनी तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. फिन अॅलन आणि डेवॉन कॉन्वे या दोघांनी तडाखेबाज फलंदाजी केली. फिन 42 धावा करुन बाद झाला. मग कर्णघार विल्यमसनने 23, जेम्स नीशमने नाबाद 26 आणि ग्लेन फिलिप्सने 12 धावांचं योगदान दिलं. पण डेवॉनने अखेरपर्यंत फलंदाजी करत नाबाद 92 धावा केल्या ज्यामुळे स्कोरबोर्डवर 200 धावा लागल्या.


त्यानंतर 201 धावांचे तगडे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. केवळ ग्लेन मॅक्सेवेलने 28 आणि पॅट कमिन्सने 23 धावांचं योदान दिलं. पण इतर फलंंदाज अगदी स्वस्तात तंबूत परतले, अखेरची काही फलंदाज तर इतक्या पटापट बाद झाले की 17.1 षटकांत सर्व संघ ऑलआऊट झाला. ज्यामुळे न्यूझीलंड 89 धावांनी विजयी झाला. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि सँटनरने प्रत्येकी 3 ट्रेन्ट बोल्टने 2 तर इश सोधी आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.


कॉन्वे ठरला सामनावीर


नाबाद 92 धावा ठोकणाऱ्या कॉन्वेला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे या कामगिरीसह त्यानं भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) मोडलाय. तसेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) विक्रमाशी बरोबरी केलीय.  विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 27 डावात 1000 धावांचा टप्पा गाठलाय. त्यानंतर बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या 26 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत डेवॉन कॉन्वेचाही समावेश झालाय. त्यानंही 26 डावात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1000 धावांचा टप्पा पूर्ण केल्या.


हे देखील वाचा -