IND vs PAK, Melbourne Weather Report : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) रविवारी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान या महामुकाबल्यावेळी पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला होता. पण आचा नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या या सामन्यात हवामान खात्याने सर्वप्रथम पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण आता मेलबर्नमध्ये बराच वेळानंतर पाऊस थांबला असून कडकडीत सूर्यप्रकाश पडला आहे. त्यामुळे सामन्यादिवशी अर्थात उद्याही पावसाची शक्यता खूपच कमी आहे.


मेलबर्नमध्ये आज म्हणजेच शनिवारी सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आणि आकाश ढगाळ झाले होते, त्यामुळे रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यावेळीही मुसळधार पाऊस पडेल, असं वाटत होतं. पण मेलबर्नच्या हवामानात अचानक बदल झाला आणि पाऊस थांबून ऊनही पडलं आहे. दरम्यान Weather.com ने आधी दिलेल्या माहितीनुसार मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक होती. पण आता हवामानात बदल झाल्यानंतर तेथे पावसाची 25 टक्के शक्यताच असल्याने सामना वेळेत आणि संपूर्ण ओव्हर्सचा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


पावसाने सामना रद्द झाल्यास काय?


टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना  गुण वाटून दिले जातील.


कसे आहेत दोन्ही संघ?


भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.


पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.


सुपर 12 कम्प्लिट


सुपर 12 मध्ये आधी असणारे 8 संघ आणि काल ग्रुप A मधून गेलेल्या श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघानंतर अजून 2 संघाची जागा मोकळी होती. ज्यामध्ये ग्रुप B मधून आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे दोन संघ गेले असून त्यामुळे सुपर 12 चे सर्व संघ आता आपल्यासमोर आले आहेत. उद्यापासून सुपर 12 चे सामना रंगणार आहेत.


हे देखील वाचा-