IND vs PAK, T20 : टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मेलबर्नच्या मैदानात सामना सुरु असून पाकिस्तानचा डाव 159 धावांवर आटोपला आहे. भारताकडून हार्दीक आणि अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत. पण पाकिस्तानकडून शान मकसून आणि इफ्तिकार अहमदने अर्धशतकं ठोकत पाकिस्तानचा डाव सावरला आहे. आता भारताला 20 षटकांत विजयसाठी 160 धावा करायची गरज आहे. 





सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला भारतासमोर आधी फलंदाजी करणं अवघड ठरत असल्यानं रोहितनं हा निर्णय़ घेतला. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही दमदार केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबरला 0 धावांवर तंबूत धाडत अर्शदीपने पहिली विकेट घेतली. त्यानंतरही भारताने गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. 4 धावा करुन रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी बुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

कसे आहेत दोन्ही संघ?


भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.


पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.


हे देखील वाचा-


IND vs PAK, Playing 11 : पाकिस्तानविरुद्ध अंतिम 11 मध्ये पंत, चहल नाही, 6 फलंदाजांसह रोहित मैदानात, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11