Umesh Yadav : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) सध्या भारतीय संघात नसल्याने इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे. पण आता त्याला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित काऊंटी हंगामात खेळू शकणार नसल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. उमेश सध्या खेळत असलेल्या मिडलसेक्स संघाने शुक्रवारी (16 सप्टेंबर) याबाबतची माहिती दिली. रॉयल लंडन चषक स्पर्धेत ग्लुसेस्टरशायर विरुद्ध मिडलसेक्स या यंदाच्या हंगामातील मिडलसेक्सच्या शेवटच्या घरच्या मैदानात खेळलेल्या सामन्यात उमेश यादवला दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याचवेळी, या दुखापतीमुळे उमेश यादव ससेक्सविरुद्ध अ गटातील अखेरच्या सामन्यात खेळू शकला नाही. ज्यानंतर आता तो उर्वरीत हंगामालाच मुकणार आहे.
मिडलसेक्सने निवेदन देत दिली माहिती
उमेश यादव खेळणाऱ्या मिडलसेक्सने एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 'आम्हाला हे जाहीर करताना खेद वाटतो की उमेश यादव क्लबसोबत उर्वरीत हंगामात खेळताना दिसणार आहे. दुखापतीमुळे तो मिडलसेक्सच्या काउंटी चॅम्पियनशिपच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे.' दुखापतीमुळे उमेश यादव बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासह भारतात पोहोचला असून यादव आता बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याची माहितीही समोर आली आहे.
रॉयल लंडन चषक स्पर्धेत ग्लुसेस्टरशायर संघाविरुद्ध उमेशला दुखापत झाल्यानंतर तो भारतात परतला. भारतात परतल्यानंतर उमेशने वैद्यकीय संघाच्या देखरेखीखाली बॅक-टू-बॉलिंगचा कार्यक्रमही सुरू केला . त्यानंतर उमेश 17 सप्टेंबर रोजी लंडनला परतणार होता, परंतु तो दुखापतीतून न सावरल्याने आतातरी इंग्लंडला परतणार नाही. उमेश यादव त्यामुळे तो मिडलसेक्सकडून दुखापतीमुळे आता उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
हे देखील वाचा-