LLC 2022 : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket 2022) आज (16 सप्टेंबर) कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स (India Maharajas vs World Giants) यांच्यात पार पडलेल्या सामन्यात इंडिया महाराजाने 6 गडी राखून विजय मिळवला. यावेळी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर तसंच जगभरातील निवडक माजी दिग्गज क्रिकेटर मैदानात उतरल्याचे दिसून आलं. सामन्यात भारताचे माजी क्रिकेचर युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी नाबाद खेळी केली तर पंकज सिंहने 5 विकेट्स घेत कमाल केली. 






सामन्यात सर्वात आधी वर्ल्ड जायंट्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. त्यांच्याकडून सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या केविन ओब्रायन याने अर्धशतक ठोकत 52 धावा केल्या. त्याच्याशिवाय रामदिन यांनी 42 धावा केल्या. पण इतर खेळाडू खास कामगिरी करु शकले नाहीत. ज्यामुळे त्यांनी इंडिया महाराजासमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले. इंडिया महाराजाकडून पंकज सिंह याने 4 षटकं टाकत 26 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. याशिवाय हरभजन, जोगिंदर आणि मोहम्मद कैफ यांनीही एक-एक विकेट घेतली. 






पठाण बंधूची कमाल, भारताचा विजय


171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया महाराजा संघाची सुरुवात खराब झाली. पार्थिव 18 तर सेहवाग 4 धावा करुन तंबूत परतले. पण तन्मय श्रीवास्तने 54 धावा ठोकत महत्त्वाची कामगिरी बजावली. कैफने 11 धावा केल्या. ज्यानंतर मात्र युसूफ पठाणने नाबाद 50 आणि इरफान पठाणने नाबाद 20 धावा करत भारताला 18.4 षटकात 6 विकेट्सनी विजय मिळवून दिला. 


हे देखील वाचा-