T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आलीय. श्रीलंका  बोर्डानं जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात दुष्मंता चमीरा आणि लाहिरू कुमारा यांना संधी देण्यात आलीय. परंतु, त्यांचा सहभाग त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. तर, अशेन बंडारा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चांदिमल, बिनुसार फर्नांडो आणि नुवानिडु फर्नांडो यांची राखीव खेळाडू म्हणून संघात निवड करण्यात आलीय. 


यंदाच्या आशिया चषकात श्रीलंकेच्या संघानं जबरदस्त कामगिरी करत खिताब जिंकला होता. श्रीलंकेच्या बोर्डानं आशिया चषकानंतर टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला संघ जवळपास एक सारखाच आहे. आशिया चषकात संघात पुनरागमन करणाऱ्या दिनेश चांदीमलची टी-20 विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून निवड झालीय. 


ट्वीट-



16 संघामध्ये रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेच्या संघाचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या या आठ संघांनी सुपर 12 साठी पात्रता मिळवली आहे. 


टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर
दासून शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वानिंदु हसरंगा, महेश तीक्षणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा (फिटनेसवर अवलंबवून), लहिरू कुमारा, दिलशान मधुशंका, प्रमोद मधुशान.
राखीव खेळाडू- अॅशेन बंडारा, प्रवीण जयविक्रेमा, दिनेश चंदीमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिंदु फर्नांडो.


आस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 


हे देखील वाचा-