Team India : रविवारी मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे कट्टर संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी चांगलाच सराव केला (Practice Session) असून अगदी एक दिवस शिल्लक असतानाही टीम इंडिया तितकाच कसून सराव करत आहे. बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या सराव सत्राचे काही फोटो शेअर केले (BCCI Posts Photo) आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करत खास रणनीती आखताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड तसंच कर्णधार रोहित शर्मासोबत खास गप्पा मारताना दिसत असून हाच फोटो टीम इंडियाची खास रणनीती म्हणून व्हायरल होत आहे.


फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह (Rahul Dravid) फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड दिसत आहेत. दरम्यान भारतीय संघाने आखलेली खास रणनीती केलेला कसून सराव रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किती कामी येतो? का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. याशिवाय बीसीसीआयने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहलचे, सूर्यकुमार यादव असे सारेच नेटप्रॅक्टीस करताना दिसत आहेत.


पाहा फोटो-










सामन्यात पावसाता व्यत्यय येणार का?


मेलबर्नमध्ये आज म्हणजेच शनिवारी सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आणि आकाश ढगाळ झाले होते, त्यामुळे रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यावेळीही मुसळधार पाऊस पडेल, असं वाटत होतं. पण मेलबर्नच्या हवामानात अचानक बदल झाला आणि पाऊस थांबून ऊनही पडलं आहे. दरम्यान Weather.com ने आधी दिलेल्या माहितीनुसार मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक होती. पण आता हवामानात बदल झाल्यानंतर तेथे पावसाची 25 टक्के शक्यताच असल्याने सामना वेळेत आणि संपूर्ण ओव्हर्सचा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


हे देखील वाचा-


IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका, स्टार फलंदाज दुखापतीमुळे सामन्याला मुकणार