T20 World Cup, ENG vs AFG : इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरी सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंड संघाने भेदक गोलंदाजी केली, ज्यामुळे केवळ 112 धावांवर अफगाणिस्तानचा संघ ऑलआऊट झाला. विशेष म्हणजे यावेळी इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनने (Sam Curran) 5 विकेट्स घेत एक नवा रेकॉर्ड केला आहे. एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 5 विकेट्स घेणारा सॅम पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्या या रेकॉर्डबाबत आयसीसीनेही ट्वीट करत माहिती दिली आहे.






सॅम याने अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या गोलंदाजीचा विचार करता त्याने एकूण 3.4 ओव्हर टाकत केवळ 10 धावा देत एकूण 5 विकेट्स घेतल्या. त्याने इब्राहिम जद्रान, उस्मान घनी, अजमतुल्लाह, राशिद खान आणि फझलक फारुकी असे अत्यंत महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले. त्याच्या या गोलंदाजीच्या जोरावरच केवळ 112 रनवर अफगाणिस्तानचा संघ सर्वबाद झाला.


सामन्याचा लेखा-जोखा


सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इंग्लंडच्या फलंदाजांनी अगदी सुरुवातीपासून उत्कृष्ट गोलंदाजी सुरु केली. सलामीवीर 7 आणि 10 धावा करुन स्वस्तात माघारी परतले. केवळ इब्राहीम जद्रान आणि उस्मान घनी यांनी अनुक्रमे 32 आणि 30 धावा करत संघाचा डाव 100 च्या पुढे पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर मात्र इतर फलंदाज अत्यंत कमी धावा करुन तंबूत परतले, ज्यामुळे 112 धावांवर अफगाणिस्तानचा संघ सर्वबाद झाला. 


113 धावांचे सोपे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाने सुरुवात चांगली केली. सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने फटकेबाजी सुरु केली. पण काही वेळातच बटलर 18 आणि हेल्स 19 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर डेविड मलान यानेही 18 धावा केल्या, तो बाद झाल्यानंतर एक-एक फलंदाज बाद होऊ लागले. पण लियाम लिव्हिंगस्टोनच्या नाबाद 29 धावांच्या जोरावर इंग्लंडने 5 गडी राखून सामना जिंकला. 


हे देखील वाचा-


T20 World Cup 2022: तब्बल 11 वर्षानंतर न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियात पहिला सामना जिंकला; केन विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघानं रचला इतिहास