T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आता सुपर 12 चे सामने सुरु झाले आहेत. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लडने 5 गडी राखून विजय मिळवला. यावेळी आधी उत्कृष्ट गोलंदाजी केल्यानंतर अफगाणिस्तानला 112 धावांत इंग्लंडने सर्वबाद केलं. मग चिवट झुंज देत, अखेर 18.1 षटकांत 113 धावा केवळ 5 गडी गमावून स्कोरबोर्डवर लावल्या आणि सामना खिशात घातला.   






सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इंग्लंडच्या फलंदाजांनी अगदी सुरुवातीपासून उत्कृष्ट गोलंदाजी सुरु केली. सलामीवीर 7 आणि 10 धावा करुन स्वस्तात माघारी परतले. केवळ इब्राहीम जद्रान आणि उस्मान घनी यांनी अनुक्रमे 32 आणि 30 धावा करत संघाचा डाव 100 च्या पुढे पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर मात्र इतर फलंदाज अत्यंत कमी धावा करुन तंबूत परतले, ज्यामुळे 112 धावांवर अफगाणिस्तानचा संघ सर्वबाद झाला. 


113 धावांचे सोपे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाने सुरुवात चांगली केली. सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने फटकेबाजी सुरु केली. पण काही वेळातच बटलर 18 आणि हेल्स 19 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर डेविड मलान यानेही 18 धावा केल्या, तो बाद झाल्यानंतर एक-एक फलंदाज बाद होऊ लागले. पण लियाम लिव्हिंगस्टोनच्या नाबाद 29 धावांच्या जोरावर इंग्लंडने 5 गडी राखून सामना जिंकला. 


ऑस्ट्रेलियाही दारुण पराभूत


सुपर 12 फेरीच्या सलामीच्या सामन्यात मागील वेळीचा विश्चचषक विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ 89 धावांनी न्यूझीलंडकडून पराभूत झाला आहे. सामन्यात न्यूझीलंडने दमदार फलंदाजी आणि मग भेदक गोलंदाजी दाखवत विजय मिळवला आहे. यावेळी न्यूझीलंडने आधी डेवॉन कॉन्वेच्या नाबाद 92 धावांच्या जोरावर 200 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आणि मग साऊदी, सँटनर जोडीच्या गोलंदाजीच्या मदतीने 111 धावांवर ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केलं.


हे देखील वाचा-