World Cup Semi Final scenario : पाकिस्तान औपचारिकरित्या वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झालं आहे. टीम इंडियाने साखळी सामन्यांमध्ये एकही पराभव न स्वीकारता सेमीफायनलला मजल मारली आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन पराभव स्वीकारत सेमीफायनला धडक मारली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दोन पराभव स्वीकारत सेमीफायनलसाठी पात्र ठरला. तर चौथ्या नंबरवरती अपेक्षेप्रमाणे न्यूझीलंडने बाजी मारली आहे. त्यामुळे सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले असून टीम इंडियाची लढत सलग पाचव्यांदा सेमीफायनलला पोहोचलेल्या बलाढ्य न्युझीलंडशी होईल. 


 मागील दोन सामन्यांमध्ये थरारक कामगिरी केलेल्या ऑस्ट्रेलियाची लढत दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्यामुळे चार तगडे संघ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचल्याने नेमकी बाजी कोण मारणार? याकडे आता क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. तसं पाहायला गेल्यास टीम इंडियाची कामगिरी या वर्ल्डकपमध्ये अतिशय अविस्मरणीय आणि विरोधी संघांना धडकी भरवणारी अशा पद्धतीने झाली आहे. सर्वच विरोधी संघांना टीम इंडियाने एकतर्फी मात दिली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध गेल्या वीस वर्षात वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये टीम इंडियाला पराभूत करता आलं नव्हतं. मात्र, त्या दोन संघांना सुद्धा लोळवण्याची कामगिरी टीम इंडियाने एकहाती केली. 






या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला सुद्धा अवघ्या 55 धावांमध्ये गुंडाळत टीम इंडियाने आपला करिष्मा दाखवून दिला. टीम इंडियाची बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही फळी फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे टीम इंडिया न्यूझीलंडला पुन्हा एकदा मात देणार का? याकडे आता लक्ष आहे. न्यूझीलंडने दुसरीकडे 2019 मध्ये भारताला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. धोनी धावबाद झालेला प्रसंग अजूनही काळीज चिरून जातो. मात्र, त्यांना अत्यंत रोमहर्षक सामन्यांमध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ही कसर भरून यावेळी भरून काढणार का? याकडे आता लक्ष असेल.


न्यूझीलंड हा भारतासाठी वर्ल्डकपच्या इतिहासात नेहमीच डोकेदुखीचा संघ राहिला आहे. मात्र, या वर्ल्डकपमध्ये हा इतिहास साखळी फेरीत मोडीत काढला आहे. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती टीम इंडियाला 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीजला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमर करावी लागेल. जी सांघिक कामगिरी आजवर राहिली आहे तीच सांघिक कामगिरी बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध करावी लागेल, यामध्ये तीळमात्र शंका नाही. 






दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने सुद्धा या स्पर्धेत अपवाद सोडल्यास बेधडक कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा ठोकणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांकावर क्विंटन डिकाॅक आहे. त्याचबरोबर स्पर्धेत सर्वाधिक 300 वर धावा ठोकण्याचा पराक्रमही दक्षिण आफ्रिका संघाने केला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका संघ सेमीफायनल आणि फायनलला आल्यानंतर नेहमीच कच खातो, हा जो त्यांच्यावर आजवरचा शिक्का लागून गेला आहे तो शिक्का आता या निमित्ताने पुसणार का? याकडेही लक्ष असेल. मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी हे आव्हान निश्चितच सोपं नसेल. याचं कारण त्यांची लढत ही पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. मागील दोन सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध मिळवलेला विजय हा दक्षिण आफ्रिकेसाठी एक प्रकारे धडकी भरवणार आहे. 


चेस करताना दक्षिण आफ्रिका संघ नेहमीच कचकाऊ फलंदाजी करतो. त्याच ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांमध्ये एकहाती रन चेस करत पहिल्यांदा अफगाणिस्तानला मात दिली. त्यानंतर बांगलादेशला मात दिली. अफगाणिस्तानविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलची खेळी ही क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये नव्हे तर क्रिकेटच्या अध्यायातील एक सुवर्णपान म्हणून नोंदवली गेली आहे. चेस करताना द्विशतकी तडाखा देण्याचा पराक्रम मॅक्सवेलने केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्याचे स्वप्न दक्षिण आफ्रिकेला पेलणार का? हाच मोठा प्रश्न आहे.  चार मातब्बर संघ मातब्बर संघ सेमी फायनल मध्ये पोहोचल्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सुद्धा मोठी मेजवानी असेल, यामध्ये शंका नाही. सामना कोणताही असो चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.  


भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल डिटेल्स 



  • या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. 

  • सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल. 

  • 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता सुरू होईल.

  • टीव्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स 1 चॅनलवर लावू शकतात. 

  • मोबाईलवर पाहण्यासाठी, दर्शकांना त्यांच्या मोबाईल फोनवर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल, ज्यामध्ये दर्शक भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात.


ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमीफायनल डिटेल्स



  • विश्वचषकाचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना गुणतालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये म्हणजेच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

  • सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.

  • 16 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल.

  • टीव्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स चॅनलवर संपर्क साधू शकतात.

  • मोबाईलवर पाहण्यासाठी, दर्शकांना त्यांच्या मोबाईल फोनवर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल, ज्यामध्ये दर्शक भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात.


इतर महत्वाच्या बातम्या