Diwali 2023: दिवाळी (Diwali 2023) हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धनत्रयोदशीपासून सुरू झालेला हा उत्सव भाऊबीजेपर्यंत चालणार आहे. या काळात  कार्तिक महिन्याची चतुर्दशी ही नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते. यंदा 12 नोव्हेंबरला ही दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणात दिव्यांच्या रोषणाईला खूप महत्त्व आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की दिवाळीला नेमके किती दिवे लावावेत? तर आज जाणून घेऊया दिवाळीच्या दिवशी किती दिवे लावणं शुभ आहे.


दिवाळीच्या दिवशी किती दिवे लावावे?


छोट्या दिवाळीच्या दिवशी पाच दिवे लावणं शुभ मानलं जातं. तुम्ही 7,14,17 दिवे देखील लावू शकता. या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून घराच्या मुख्य टेबलवर ठेवणं शुभ मानलं जातं. मुख्य गेटवर लावलेला दिवा चार बाजूंनी असावा.
 
याशिवाय छोटी दिवाळी, म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रदोषकाळात यमदेव म्हणजेच यमराजाच्या नावाने दिवा लावावा. यमदीपक हा चार मुखी दिवा आहे, जर चारमुखी दिवा नसेल तर तुम्ही साधारण दिव्यात चार वाती लावू शकता ज्या चार दिशा दर्शवतात. सूर्यास्तानंतर सुरू होणाऱ्या प्रदोष काळात हा दिवा प्रज्वलित केला जातो. रात्रीच्या वेळी हा दिवा प्रज्वलित करून दक्षिण दिशेला ठेवला जातो, जी यमाची दिशा मानली जाते.


दिव्यांची दिशा योग्य असणं महत्त्वाचं


छोट्या दिवाळीच्या दिवशी पाच दिवे लावल्यानंतर ते योग्य दिशेने ठेवणं महत्त्वाचं आहे. पाच दिव्यांपैकी पहिला दिवा उंच ठिकाणी ठेवावा. दुसरा घराच्या स्वयंपाकघरात ठेवावा. तिसरा दिवा पिंपळाच्या झाडाखाली, चौथा दिवा जिथे पाणी ठेवतो तिथे आणि पाचवा दिवा घराच्या मुख्य गेटवर लावला जातो.


दिवाळीच्या सकाळी करा ही कामं



  • दिवाळीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराची साफसफाई करणं शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, यामुळे देवी लक्ष्मी घरात कायम वास करते आणि संपत्तीची, धनाची कधीही कमतरता भासत नाही.

  • दिवाळीत तुळशीच्या रोपाची पूजा करणं देखील शुभ मानलं जातं. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी देवी वास करते असं म्हणतात. दिवाळीच्या दिवशी तुळशीची पूजा करून जल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन संपत्तीचं भांडार भरुन टाकते.

  • दिवाळीला तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणं देखील शुभ आहे.

  • दिवाळीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर अभ्यांगस्नान करावं, यानंतर तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून थोडं पाणी वाचवावं. उरलेलं पाणी घरभर शिंपडावं, असं केल्याने घरात सुख-शांती राहते आणि सकारात्मकता येते.

  • दिवाळीच्या दिवशी घराची साफसफाई करून घराच्या अंगणात रांगोळी काढणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की असं केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि अशा घरात ती आधी प्रवेश करते, ज्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023: दिवाळीच्या दिवशी घराच्या दारावर लावा 'ही' गोष्ट; लक्ष्मी होईल आकर्षित, कधीही भासणार नाही पैशाची कमी