पुणे : वर्ल्डकपच्या सर्वात रोमांचक विजयाची नोंद अफगाणिस्तानविरुद्ध केल्यानंतर आज बांगलादेशी संघ मिचेल मार्शच्या वादळासमोर टिकू शकला नाही. कांगारूंनी बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने शानदार खेळी केली. मिचेल मार्शने 132 चेंडूत नाबाद 177 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 17 चौकार आणि 9 षटकार मारले. मिचेल मार्शच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 44.2 षटकांत 2 गडी गमावून 307 धावांचे लक्ष्य गाठले. डेव्हिड वॉर्नरने 61 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार मारले. विश्वचषकातील पराभवाने बांगलादेशचा प्रवास असाच संपला आहे.
मिशेल मार्शच्या झंझावाताने बांगलादेशचा धुव्वा उडवला
बांगलादेशच्या 306 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड 11 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ट्रॅव्हिस हेडला तस्किन अहमदच्या गोलंदाजीवर बाद केले. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्यात 120 धावांची भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाला 132 धावांवर दुसरा धक्का बसला. डेव्हिड वॉर्नरला मुस्तफिजुर रहमानने बाद केले.
मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथने एकही संधी दिली नाही...
ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतले, पण बांगलादेशचा त्रास काही कमी झाला नाही. यानंतर मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सांभाळला. मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात 175 धावांची भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी बांगलादेशी गोलंदाजांविरुद्ध सहज धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 61 चेंडूत 53 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना 1-1 यश मिळाले.
नाणेफेक हारल्यानंतर बांगलादेशी संघ प्रथम फलंदाजीला आला
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशने 50 षटकांत 8 गडी गमावून 306 धावा केल्या. बांगलादेशकडून तौदीह हृदयाने 79 चेंडूत सर्वाधिक 74 धावा केल्या. याशिवाय तनजीद हसन, लिटन दास. नजमुल हुसेन शांतो, महदुल्ला आणि मेहदी हसन मिराज यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी खेळल्या. त्यामुळे बांगलादेशी संघाने 300 धावांचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाकडून सीन अॅबॉट आणि अॅडम झाम्पा यांना 2-2 यश मिळाले. तर मार्कस स्टॉइनिसला 1 यश मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या