World Cup 2023 : ICC ODI  वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात भारतात 5 ऑक्टोबरपासून झाली. ज्यामध्ये 10 देशांचे संघ ट्रॉफी आणि रोख पारितोषिकासाठी लढत आहेत. आशियाई देशांमध्ये क्रिकेटचा मोठा प्रभाव असला, तरी फुटबॉल हा युरोपमधील बहुतांश खेळांमध्ये प्रबळ खेळ असल्याचे दिसते. अब्जावधी प्रेक्षकांमध्ये फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन लोकप्रिय खेळ मानले जातात. त्यामुळे दोन्ही खेळातील वर्ल्डकप हे चाहत्यांसाठी पर्वणी असतात. त्यामुळे या दोन्ही वर्ल्डकपमध्ये बक्षिसाची रक्कम नेमकी किती असते? दर्शकसंख्या आणि या दोघांच्या जाहिरातींच्या कमाईबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊया या दोन्हीमध्ये नेमकी किती कमाई होते, आणि विजेत्या संघाला किती कोटींचे बक्षीस दिले जाते. 


फुटबाॅल आणि क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 300 कोटींचे अंतर 


क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या टीमला आयसीसीकडून 33.17 कोटी रुपयांचे बक्षीस दिलं जाणार आहे. सेमीफायनल हरणाऱ्या दोन्ही संघांना 6.33 कोटी रुपये मिळतील. ग्रुप स्टेजमध्ये सामने जिंकल्यानंतर प्रत्येक संघाला 33.17 लाख मिळणार आहेत. एकूण मिळून 82.95 कोटी रुपये वाटले जाणार आहेत. 


अर्जेंटिना 349 कोटी रुपयांचे रोख बक्षीस घेऊन गेला


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) या वर्षाच्या सुरुवातीला एकदिवसीय वर्ल्डकपसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली होती. ODI फॉरमॅट क्रिकेट वर्ल्ड टूर्नामेंटची एकूण बक्षीस रक्कम USD 10 मिलीयन डाॅलर्स आहे. जी भारतीय चलनात 84 कोटी रुपये आहे. दरम्यान, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने जिंकलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये 42 मिलियन डाॅलर्स इतकी बक्षीस रक्कम होती. विजेता संघ अर्जेंटिना 349 कोटी रुपयांचे रोख बक्षीस घेऊन गेला, तर उपविजेता संघ फ्रान्सने 250 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले.


FIFA वर्ल्डकपला 2022 मध्ये जगभरात 3.5 अब्ज पेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या प्राप्त केली होती. ज्यामुळे तो वर्ल्डकप आतापर्यंत सर्वात जास्त पाहिला गेलेल आहे. ODI वर्ल्डकपला जगभरातील सरासरी 1.6 अब्ज लोकांनी पाहिलं आहे. FIFA वर्ल्डकप जाहिरातींच्या कमाईचा विचार करता, जागतिक सॉकर स्पर्धेपर्यंतच्या जाहिरातींच्या चार वर्षांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक कमाई 62,000 कोटी रुपये इतकी नोंदवली आहे. एकदिवसीय वर्ल्डकप 2023 मध्ये जाहिरात कमाई उद्दिष्ट सुमारे 2000 कोटी रुपये आहे. जी FIFA वर्ल्डकपपेक्षा खूपच कमी आहे.


इतर महत्वाच्या बातम्या