नाशिक : नाशिकच्या (Nashik) गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट (DJ) आणि लेझर लाईटचा (laser lights) प्रकाश यामुळे विसर्जनक मिरवणूक चांगली चर्चेची ठरली. मात्र आगामी काळात नवरात्री उत्सवात लेझर लाईट असो वा डीजे साऊंड सिस्टिम किंवा अन्य कुठलीही आवाजाची यंत्रणा असो, ज्यामुळे ध्वनीची कमाल मर्यादा पातळी ओलांडली जात असेल, अशा मंडळांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा स्पष्ट इशारा नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) देण्यात आला आहे.


नुकताच राज्यासह नाशिक शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव (Ganeshotsav) पार पडला. या गणेशोत्सव मिरवणुकीत (Ganesh Visarjan) डीजेचा दणदणाट ऐकायला मिळाला. तर दुसऱ्या दिवशी जुलूसमध्ये देखील डीजे साऊंड सिस्टिमचा वापर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे संबंधित गणेश मंडळांसह जुलूस आयोजकांवर नाशिक पोलिसांकडून (Nashik police) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र आता गणेशोत्सव असो किंवा मग नवरात्र उत्सव असो किंवा मग अन्य कुठल्याही सण असो, यावेळी दोन्ही मर्यादेची कमाल पातळी (Decibel) ओलांडली जात असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, यामुळे नवरात्रोत्सवासाठी (Navratri 2023) काही वेगळे नियम राहणार नाही, असे नाशिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी देखील कारवाईचे आदेश दिले आहेत. 



दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीत (Nashik ganesh Visarjan) लेझर शो वापरल्यामुळे काही तरुणांच्या डोळ्यांवर मोठा आघात झाल्याचा दावा नेत्ररोग चिकित्सांकडून करण्यात आला. त्यानंतर डीजेसह लेझर लाईटचा प्रश्न राज्यभरात गाजला. नाशिकमध्ये आत्तापर्यंत सहा जणांना अशा प्रकारचा त्रास झाल्याचे नेत्ररोग तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात आदिशक्तीचा उत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी आत्तापासून शहर पोलीस प्रशासनाने चोख नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.


ध्वनी प्रदूषण कोठेही खपवून घेतले जाणार नाही, लॉन्स असो किंवा एखादे हॉटेल अथवा मोकळे पटांगणावर दांडिया, गरबा सुरू असल्यास त्या ठिकाणी आवाजाची पातळी ही मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये, असे पोलिसांनी म्हटले आहे. अन्यथा संबंधित आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.


 नवरात्रीत असणार विशेष पथकांची नियुक्ती 


नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीत अति प्रमाणात लेझरचा वापर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच पाच ते सहा मंडळांकडून डीजे सर्रास वापर केला गेल्याचे पोलीस कारवाईतून स्पष्ट झाले. यामुळे आता आगामी नवरात्र उत्सव काळात रंगणाऱ्या दांडिया गरबा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी डीजे लावणाऱ्या मंडळांचा परवानगी अर्ज थेट रद्द केला जाणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळाचे धाबे दणाणले आहेत. यामुळे नवरात्रीत डीजेच्या आवाज मर्यादाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून नवरात्र उत्सव मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर नवरात्रीत विशेष पथकांची नियुक्ती असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Lesar Light : विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे तरुणांच्या डोळ्यांत उतरलं रक्त, नाशिकमधील प्रकार, नेमकं प्रकरण काय?