एक्स्प्लोर

World Cup 2019 | मॅन्चेस्टरमध्ये कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम

विराट कोहलीनं मॅन्चेस्टरमध्ये 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांनीही 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला होता.

मॅन्चेस्टर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं मॅन्चेस्टरमध्ये 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. त्यानं 417 डावांत हा टप्पा गाठून सर्वात जलद 20 हजार धावा करण्याचा मान मिळवला. विराटनं मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर विंडीजविरुद्ध विश्वचषकाच्या साखळी सामन्यात 37 वी धाव घेत लारा आणि सचिनचा विक्रम मागे टाकला. विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांनीही 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण करणारा विराट हा भारताचा केवळ तिसराच फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या खात्यात 34,357 धावा जमा आहेत. तर राहुल द्रविडनं 24,208 धावांचा रतीब घातलाय. विराटची अकरा वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सामने - 376 डाव - 417 धावा - 20,035 सरासरी - 56.43 शतकं - 66 अर्धशतकं - 93 विश्वचषकात विराटचं सलग चौथं अर्धशतक विराट कोहलीनं इंग्लंडमधल्या विश्वचषकात आपला सुपर फॉर्म कायम ठेवला आहे. त्यानं मॅन्चेस्टरमध्ये यंदाच्या विश्वचषकातलं सलग चौथं अर्धशतक साजरं केलं. एकाच विश्वचषकात सलग चार वेळा पन्नास पेक्षा अधिक धावा करणारा तो सचिन आणि नवज्योत सिंग सिद्धूनंतरचा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. विराटनं यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 82, पाकिस्तानविरुद्ध 77, अफगाणिस्तानविरुद्ध 67 आणि विंडीजविरुद्ध 72 धावा अशा सलग अर्धशतकी खेळी साकारल्या. भारताचा माजी कसोटीवीर नवज्योत सिंग सिद्धूनं 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा अशी कामगिरी बजावली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं 1996 आणि 2003 च्या विश्वचषकात सलग चार वेळा पन्नासहून अधिक धावा फटकावल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget