एक्स्प्लोर

world cup 2019 | आज पाकिस्तान-बांग्लादेश लढत, सेमीफायनलसाठी पाकचा रस्ता कठीण, नाणेफेक हरल्यास पाकिस्तान बाहेर!

उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला बांग्लादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल. प्रचंड धावांच्या फरकाने बांग्लादेशला हरवावं लागणार आहे. त्यासाठी पाकिस्तानला पहिली फलंदाजी करणे अनिवार्य आहे.

लंडन : इंग्लंडनं न्यूझीलंडवर मिळवलेल्या या विजयाने पाकिस्तानचं विश्वचषकातलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. कारण आज बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात मोठा दिव्य पराक्रम केला तरच पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. मात्र दिव्य करणे खूपच अवघड आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला बांग्लादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल. प्रचंड धावांच्या फरकाने बांग्लादेशला हरवावं लागणार आहे. त्यासाठी पाकिस्तानला पहिली फलंदाजी करणे अनिवार्य आहे. म्हणूनच सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला टॉस जिंकावा लागेल. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल. जर बांग्लादेशना नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला तर मात्र पाकिस्तानला कुठल्याही स्थितीत सेमीफायनल गाठणे कठीण होईल. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना कितीही मोठा विजय मिळवला तरीही पाकिस्तानचा नेट रनरेट सेमीफायनल गाठण्याइतका वाढणार नाही. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत  झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी धुव्वा उडवला आणि पाकिस्तानचा पत्ता जवळपास कट झाला. इंग्लंडने बारा गुणांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडवर मिळवलेल्या या विजयाने पाकिस्तानचं विश्वचषकातलं उरलंसुरलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे असं म्हणू शकतो. आजचा सामना जिंकून इंग्लंडने 12 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. तर न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट +0.175 आहे. तर पाकिस्तान 9 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. परंतु पाकिस्तानचा नेट रनरेट -0.792 इतका आहे. त्यामुळे पाकिस्तानने बांग्लादेशविरुद्धचा सामना जिंकून 11 गुण कमावले तरी, नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा कमी असल्याने पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करु शकणार नाही. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने या सामन्यात 400 धावांची मजल मारली, तर बांगलादेशला 84 धावांत गुंडाळून त्यांना 316 धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. पाकिस्तानने जर या सामन्यात 350 धावांची मजल मारली, तर बांगलादेशला 38 धावांत गुंडाळून, त्यांना 312 धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. तरच पाकिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होईल. त्याच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेशदेखील मिळेल. जर पाकिस्तानला धावांचा पाठलाग करावा लागला, तर त्या विजयाचे अंतर नेट रनरेटसाठी उपयोगी ठरणार नाही. पाकिस्तानने एकही विकेट न गमावता बांग्लादेशने दिलेले आव्हान पार केले तरी पाकिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होऊ शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानला त्यांचा गाशा गुंडाळावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
IND vs WI 5th T20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
IND vs WI 5th T20 : शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका
शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
Embed widget