एक्स्प्लोर

World Cup 2019 : इंग्लंडची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या, मॉर्गनकडून अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा पाऊस

यंदाच्या विश्वचषकातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज राशीद खान सर्वाधिक महागडा ठरला. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या नऊ षटकांत तब्बल 110 धावा कुटल्या.

मँचेस्टर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध षटकारांची बरसात केली. मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर ३९७ धावांचा डोंगर उभा केला आहे.कर्णधार मॉर्गनने शानदार खेळी करत केवळ 57चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने  71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने १४८ धावांची खेळी केली. मॉर्गनसह जॉनी बेअरस्टोनं 90 तर ज्यो रुटनंही 88 धावांची खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला 50 षटकांत सहा बाद 397 धावांचा डोंगर उभारता आला. यंदाच्या विश्वचषकातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.  अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज राशीद खान सर्वाधिक महागडा ठरला. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या नऊ षटकांत तब्बल 110 धावा कुटल्या. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ४४ धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी 120 धावांची भागीदारी केली.  बेअरस्टोचे शतक मात्र हुकले. 90 धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने  तुफानी फटकेबाजी करत केवळ 57 चेंडूत शतक ठोकले. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 71 चेंडूत 148 धावांची खेळी केली. मोठा फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने चार षटकार आणि एक चौकार खेचत केवळ 9 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि संघाला 50 षटकात सहा बाद 397 धावांची मजल मारून दिली. इंग्लंडनं चार सामन्यांमध्ये तीन विजयासह सहा गुणांची कमाई केली आहे. त्या सहा गुणांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. आता अफगाणिस्तानला हरवून उपांत्य फेरीच्या दिशेनं पाऊल टाकण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. अफगाणिस्तानला यंदाच्या विश्वचषकात पहिल्या चारपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Digvesh Rathi Catch : फिन एलन आऊट होता की षटकार होता? दिग्वेश राठीनं घेतलेल्या कॅचवरुन वादाचा भडका, व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
फिन एलन आऊट होता की षटकार होता? दिग्वेश राठीनं घेतलेल्या कॅचवरुन वादाचा भडका, व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
Sangli Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Embed widget