एक्स्प्लोर
World Cup 2019 : टीम इंडियासमोर 338 धावांचे लक्ष्य, मोहम्मद शमीच्या पाच विकेट्स
बेअरस्टोनं ज्यो रूटच्या साथीनं इंग्लंडच्या डावाला गती दिली. त्यानं वन डे कारकीर्दीतलं आपलं आठवं शतक साजरं केलं. त्यानं 90 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकार ठोकून शतकाला गवसणी घातली. तर 109 चेंडूत 111 धावांची खेळी केली.

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅमच्या मैदानात भारत आणि इंग्लंड संघांत विश्वचषकाच्या साखळी सामन्यात जॉनी बेअरस्टोचे शतक आणि बेन स्टोक्स, जेसन रॉयच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान इंग्लंडने सात बाद 337 धावांपर्यंत मजल मारली आहे. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने शतकी सलामी देत इंग्लंडच्या धावसंख्येचा पाया मजबूत केला. दोघांनी सलामीला 160 धावांची भागीदारी रचली. जेसन रॉय 57 चेंडूंत 66 धावा करुन बाद झाला. मग बेअरस्टोनं ज्यो रूटच्या साथीनं इंग्लंडच्या डावाला गती दिली. त्यानं वन डे कारकीर्दीतलं आपलं आठवं शतक साजरं केलं. त्यानं 90 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकार ठोकून शतकाला गवसणी घातली. तर 109 चेंडूत 111 धावांची खेळी केली. मोहम्मद शमीने आपल्या बेअरस्टोला माघारी धाडलं. कर्णधार मॉर्गनही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली.
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला






















