Womens World Boxing Championships: भारतीय बॉक्सर निखत झरीनने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये थायलंडच्या जुतामास जितपाँगचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 52 किलो वजनी गटात थायलंडच्या खेळाडूचा 5-0 असा पराभव केला.


जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सर ठरली आहे. तिच्या आधी एमसी मेरी कोम, सरिता देवू, जेनी आरएल आणि लेखा सीएसी यांनीही हा पराक्रम केला आहे. या सामन्यात निखतची सुरुवात थोडी संथ गतीने झाली. सामन्यात ती थायलंडच्या खेळाडूपासून सतत अंतर राखत खेळत होती. पहिल्या फेरीत निखतने थायलंडच्या खेळाडूला चांगली टक्कर दिली. मात्र दुसऱ्या फेरीत थायलंडच्या खेळाडूने कमबॅक करत निखतपेक्षा जास्त गुण मिळवले.  


तिसऱ्या फेरीत निखत झरीनने गती दाखवत हुशारीने गुण मिळवत जितपाँगवर आघाडी मिळवली. यावेळी जितपाँगनेही पंच मारून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र निखतने तो चुकवला. तिसऱ्या फेरीत गुणतालिकेत मागे सरताना पाहून जितपाँग अधिक आक्रमक होऊन खेळत होती. मात्र निखतने स्वतःवर संयम ठेवत तिला शेवटच्या सेकंदापर्यंत चांगली लढत देत हा सामना जिंकला.     


दरम्यान, यापूर्वी तिने 52 किलो गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडाचा 5-0 असा पराभव केला होता. तसेच निखत शिवाय अन्य दोन भारतीय बॉक्सर्सना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मनीषा मौन (57 किलो) आणि नवोदित परवीन हुडा (63 किलो) यांना कांस्यपदक मिळाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


RCB vs GT : हार्दिक पांड्याची कर्णधाराला साजेशी खेळी, आरसीबीपुढे 169 धावांचे आव्हान
बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडचा तोल ढासळला, पॅड फेकले, बॅट आदळली, पाहा Video 
IPL 2022 : मूळ किंमतीत खरेदी केले, संघाला लागली लॉटरी, किंमत अन् प्रदर्शन पाहून व्हाल चकीत 
IPL 2022 : मूळ किंमतीत खरेदी केले, संघाला लागली लॉटरी, किंमत अन् प्रदर्शन पाहून व्हाल चकीत