Matthew Wade IPL 2022 : वानखेडे मैदानावर आरसीबीविरोधात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा करत गुजरातच्या गोलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. जोश हेजलवूडने तिसऱ्याच षटकात शुभमन गिलचा अडथळा दूर केला. 21 धावांवर गुजरातने पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर मैदानावर आलेल्या मॅथ्यू वेडलाही मोठी खेळी करता आली नाही. 16 धावा काढून मॅथ्यू वेड तंबूत परतला. मॅक्सवेलच्या अचूक टप्प्यावरील चेंडूवर मॅथ्यू वेड पायचीत झाला... बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडचा तोल ढासळला... तंबूत परतल्यानंतर त्याने आपला राग व्यक्त केला.. मॅथ्यू वेडने पॅड फेकून दिले... बॅट आदळली... त्याचा राग कॅमेऱ्यात कैद झाला.. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेड पायचीत झाला.. पंचांचा हा निर्णय मॅथ्यू वेडला पचला नाही.. त्याने तात्काळ DRS घेतला. तिसऱ्या पंचांनीही मॅथ्यू वेडला बाद दिले.. बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती... तो रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला... त्यानंतर पॅव्हेलिअनमध्ये त्याने आपला राग बाहेर काढला... त्याने रागारागात पॅड फेकून दिले.. बॅट जोराने खाली मारली... हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.. त्याला काही जणांनी समजावण्याचा प्रयत्नही केला.. पण तोपर्यंत व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.. काही जणांनी त्याला अखिलाडीवृत्तीमुळे सुनावले... मॅथ्यू वेडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय...


पाहा व्हिडीओ 






तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर मॅथ्यू वेडला विश्वास बसला नाही.. त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने मॅथ्यू वेडची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.. त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.. 






गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वातील गुजरात संघाने 20 गुणांसह प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केलाय. पण फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीसाठी आजचा सामना करो या मरो असा आहे. आजच्या सामन्यात आरसीबीला विजय अनिवार्य आहे. निर्णायक सामन्यात आरसीबीच्या संघात एक मोठा बदल करण्यात आलाय. आरसीबीने मोहम्मद सिराजला वगळले आहे, त्याजागी सिद्धार्थ कौलला स्थान दिलेय. सिद्धार्थ कौल यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळत आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघातही एक बदल करण्यात आलाय. गुजरातच्या संघात लॉकी फर्गुसनचं पुनरागमन झालेय तर अल्झारी जोसेफला वगळण्यात आलेय. 


गुजरातची प्लेईंग 11 -
 शुभमन गिल, वृद्धीमान साहा (विकेटकिपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर साई किशोर, लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी, यश दयाल


आरसीबीची प्लेईंग 11 - 
विराट कोहली, फाफ डु प्सेसिस  (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल सोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक(विकेटकिपर), हर्षल पेटल, वानंदु हसरंगा, सिद्धार्थ कौल, जोश हेजलवूड