IPL 2022 Marathi News : आयपीएलचा 15 वा हंगाम समारोपाकडे वळला आहे. 22 तारखेला अखेरचा साखळी सामना होणार आहे. गुजरात आणि लखनौ या दोन संघांनी प्लेऑफमधील आपला प्रवेश निश्चित केलाय. पुढील दोन दिवसांत अन्य दोन संघावरुन पडदा उठेल. आतापर्यंत झालेल्या साखळी सामन्यात अनेक खेळाडूंनी प्रभावित केलेय. काही खेळाडूंना मूळ किंमतीत खरेदी करत संघांनी मास्टरस्ट्रोक खेळला. मूळ किंमतीत खरेदी केलेल्या काही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. यामध्ये कोलकात्याच्या उमेश यादवपासून पंजाबच्या राजपक्षे अन् राजस्थानच्या कुलदीप सेन ते लखनौच्या मोहसीन खान यांचा समावेश आहे... पाहूयात या खेळाडूंची मूळ किंमत अन् कामगिरी..  


उमेश यादव - 
कोलकाता नाईट रायडर्सने मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सच्या उमेश यादवला दोन लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले होते. उमेश यादवने यंदाच्या हंगामात भेदक मारा केलाय. उमेश यादवने पावरप्लेमध्ये कोलकात्याला प्रत्येक सामन्यात विकेट मिळवून दिली आहे. उमेश यादवने 12 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत.  


भानुका राजपक्षे -
मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने भानुका राजपक्षे याला 50 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले होते. त्याने आतपर्यंत 9 सामन्यात 206 धावा केल्या आहेत. 


कुलदीप सेन 
राजस्थान रॉयल्सने लिलावात कुलदीप सेनला 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले होते. कुलदीप सेनने सात सामन्यात 8 विकेट घेतल्या. डेथ ओव्हरमध्ये कुलदीप सेन याने भेदक मारा केलाय. 
 
आयुष बदोनी
मेगा ऑक्शनमध्ये लखनौने आयुष बदोनीवर डाव खेळला होता. आयुष बदोनीला 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत लखनौने आपल्या ताफ्यात समावेश केले होते. बदोनीने 13 सामन्यातील 11 डावात 161 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. 
 
मोहसीन खान
आयुष बदोनीनंतर लखनौने युवा मोहसीन खानला संघात घेत मास्टर स्ट्रोक मारला. मोहसीनसाठी लखनौने 20 लाख रुपये खर्च केले होते. मोहसीनेने आठ सामन्यात 13 विकेट घेतल्या. मोहसीनने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. मोहसीनसाठी भारतीय संघाची दारे उघडल्याची चर्चा आहे. 


मुकेश चौधरी
मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने मुकेश चौधरीला मूळ किंमतीत 20 लाख रुपयांत खरेदी केले होते. मुकेश चौधरीने 12 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत.