एक्स्प्लोर

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीची बैठक

नवी मुंबईः न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड उद्या केली जाणार आहे. त्यासाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक उद्या सकाळी मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर केला जाईल.   टीम इंडियाने नुकतंच वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत 2-0 असा विजय साजरा केला होता. विराट कोहलीच्या टीमला आता मायदेशात येत्या सहा महिन्यांत 13 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताच्या या परिक्षेची सुरूवात 22 सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात कुणाला स्थान मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.   या खेळाडूंवर होईल चर्चा वेस्ट इंडिज दौऱ्यात 2-0 असा विजय साजरा केल्यानंतर टीम इंडियात मोठा बदल अपेक्षित नाही. मात्र काही खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता संघात त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू फलंदाज गौतम गंभीरनेही त्याच्या फॉर्मने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्याच्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.   गंभीरने दुलीप ट्रॉफीत आतापर्यंत चार अर्धशतकी इनिंगची खेळी केली आहे. गंभीरने आतापर्यंत 80 च्या सरासरीने 320 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये 77, 57, 90 आणि 94 अशा इनिंगचा समावेश आहे.   मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा या सहा जणांचं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातलं स्थान निश्चित मानलं जातं आहे. रोहितने आजवर कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावलेली नाही. मात्र रोहितची भारतातली कामगिरी आणि कर्णधार कोहलीचा त्याच्यावरचा विश्वास पाहता रोहितला या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते.   लोकेश राहुलचा ताजा फॉर्म पाहता, चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात स्थान मिळणार की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेलं. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये पुजाराला मोठी खेळी करता आलेली नाही. पण नुकतंच दुलीप करंडक स्पर्धेत पुजाराने सलग दोन शतकं झळकावली होती.   लोकेश राहुलने विंडीजमध्ये सलामीला खेळताना दमदार कामगिरी बजावली होती. पुजारा आणि राहुलबरोबरच श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि करुण नायर या युवा फलंदाजांच्या नावावरही निवड समितीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 3rd T20 Score Update : अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
IND vs WI 3rd T20 : चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
IND A vs AUS A 3rd ODI : ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा! खेळण्यासाठी टीम मैदानाकडे फिरकलीच नाही, नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारे माहिती समोर
रणजी ट्रॉफीत पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा! खेळण्यासाठी टीम मैदानाकडे फिरकलीच नाही, नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारे माहिती समोर

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget