एक्स्प्लोर
... म्हणून रवी शास्त्रींनी सेहवागवर मात केली!
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वीरेंद्र सेहवागची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. सूत्रांनुसार कर्णधार विराट कोहलीचाही वीरुला पाठिंबा होता. मात्र अखेर या स्पर्धेत रवी शास्त्री यांनीच बाजी मारली.
![... म्हणून रवी शास्त्रींनी सेहवागवर मात केली! Why Ravi Shastri Beat Virendra Sehwag In Team India Coach Job Race ... म्हणून रवी शास्त्रींनी सेहवागवर मात केली!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/15130427/sehwag-ravi-shastri.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वीरेंद्र सेहवागची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. सूत्रांनुसार कर्णधार विराट कोहलीचाही वीरुला पाठिंबा होता. मात्र अखेर या स्पर्धेत रवी शास्त्री यांनीच बाजी मारली.
मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्यांपैकी कुणाच्याही नावावर टीम इंडियाला आक्षेप नव्हता. त्यामुळेच क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) निर्णय अंतिम असेल, असं टीम इंडियानेही स्पष्ट केलं होतं
वीरुला विराट कोहलीचंही समर्थन होतं, अशी माहिती सीएसीने घेतलेल्या मुलाखतीनंतर समोर आली. रवी शास्त्री आणि टॉम मूडी यांच्यानंतर वीरुने सर्वात चांगलं प्रझेंटेशन दिलं होतं. अर्थात वीरुने मुलाखतीची संपूर्ण तयारी केली होती, असं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.
आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटॉर म्हणून अनुभव असल्यामुळे वीरुला प्रशिक्षक म्हणूनही अनुभव होताच. मात्र बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा सल्ला वीरुला दिला. त्यानंतर वीरुने पूर्ण आत्मविश्वासाने अर्ज केला.
अर्ज करण्यापूर्वी कोहलीशी चर्चा
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनंतर अर्ज करण्यापूर्वी वीरुने कोहलीशी चर्चा करणं योग्य समजलं, असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात म्हटलं आहे. क्रिकेटमध्ये तुमचं योगदान मोठं आहे. त्यामुळे तुम्ही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याने मला काहीही अडचण नाही. भारतीय क्रिकेटसाठी चांगलं योगदान देऊ शकतो, असं वाटणारा प्रत्येक जण या पदासाठी अर्ज करु शकतो, असं कोहलीने वीरुला सांगितलं.
तुमच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि तुम्ही प्रशिक्षक म्हणून उत्तम काम कराल, याची मला खात्री आहे. पण यासाठी एक प्रोफेशनल सेटअप आहे. त्यामुळे थोडं अवघड काम आहे आणि सर्व निर्णय सीएसीच्या हातात आहे, असंही विराटने वीरुला सांगितलं.
संघासोबत असलेला सपोर्ट स्टाफ अनेक दिवसांपासूनचा आहे. त्यामुळे त्यांना संघातील प्रत्येक सदस्याच्या गरजा माहित आहेत, असंही विराट म्हणाला आणि याच मुद्द्यावर रवी शास्त्रींनी वीरुवर मात केली. कर्णधार आणि संघाच्या गरजांसाठी विस्तृत दृष्टीकोन तयार करण्यासाठी रवी शास्त्री तयार होते. संघासोबत गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या प्रत्येक स्टाफ मेंबरचं महत्व ओळखत असल्याचं रवी शास्त्रींनी मान्य केलं आणि याचाच त्यांना फायदा झाला, असंही 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)