एक्स्प्लोर

1st T20 Ind Vs NZ : यजमान किवींचा धुव्वा उडवण्यासाठी भारत सज्ज

टी20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया यजमान किवींचा मुकाबला करणार आहे.

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. उभय संघातल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी बारा वाजता हा सामना सुरु होईल. टी20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया यजमान किवींचा मुकाबला करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय साजरा केला होता. भारताने ही मालिका 4-1 ने खिशात घातली होती. परदेशी भूमीत विजयाचे नवे मापदंड रचण्याचा प्रयत्न टीम इंडिया गेल्या तीन महिन्यांपासून करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने कसोटी मालिकेत यजमान संघावर 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवला होता. भारताने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर झालेल्या दोन सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली होती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात इतकं मोठं यश मिळालं.
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना फायदा
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजय आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका जिंकल्यानंतर आता ट्वेन्टी ट्वेन्टीच्या मैदानातही वर्चस्व गाजवण्याचा टीम इंडियाच्या शिलेदारांचा निर्धार राहील. 'आम्हीसुद्धा माणसं आहोत, आमच्या शरीरालाही आरामाची गरज आहे. आम्ही विजयाची मालिका कायम राखण्याचा प्रयत्न करु' असं सलामीवीर शिखर धवन न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाला होता. युवा विकेटकीपर आणि फलंदाज रिषभ पंत वनडे मालिकाचा भाग नव्हता, मात्र टी20 मालिकेत आपली कमाल दाखवून विश्वचषकासाठी खेळणाऱ्या संघात स्थान मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.
धोनीपासून सावधान, आयसीसीचा कानमंत्र
टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी मोठ्या कालावधीनंतर टी 20 संघात पुनरागमन करत आहे. धोनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात टी20 सामना खेळला होता. दुसरीकडे, वनडे मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याचा यजमान न्यूझीलंड संघाचा प्रयत्न असेल. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2008-09 मध्ये झालेल्या टी20 मालिकेत न्यूझीलंडने 2-0 ने भारताचा पराभव केला होता.
संबंधित बातम्या :
INDvsNZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिका 4-1 ने जिंकली
INDvsNZ : पुढे नको भाऊ…घेऊन टाक!!! धोनीचा मराठी तडका

महत्त्वाच्या बातम्या

Prithvi Shaw-Akriti Agarwal Row : मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?
मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?
ENG vs IND 3rd T20 : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली! आता 7 वाजता नाही, तर 3 तास उशिरा सुरू होणार मॅच, जाणून घ्या A टू Z
भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली! आता 7 वाजता नाही, तर 3 तास उशिरा सुरू होणार मॅच, जाणून घ्या A टू Z
Sri Lanka A vs India A 2nd Test : एकाने धावा केल्या, दुसऱ्याने 10 विकेट्स घेतल्या; सुदर्शन-गुरनूर ब्रारने श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला गुडघ्यावर आणले, टीम इंडियाचा एकतर्फी विजय
एकाने धावा केल्या, दुसऱ्याने 10 विकेट्स घेतल्या; सुदर्शन-गुरनूर ब्रारने श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला गुडघ्यावर आणले, टीम इंडियाचा एकतर्फी विजय
IND VS ENG 3rd T20 Vaibhav Sooryavanshi : मँचेस्टरमध्ये नुसती झलक दाखवली, आता नॉटिंगहॅममध्ये होणार खरा राडा; वैभव सूर्यवंशी पुन्हा कधी ॲक्शनमध्ये दिसणार? वाचा A टू Z
मँचेस्टरमध्ये नुसती झलक दाखवली, आता नॉटिंगहॅममध्ये होणार खरा राडा; वैभव सूर्यवंशी पुन्हा कधी ॲक्शनमध्ये दिसणार? वाचा A टू Z

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget