न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा फलंदाज रॉस टेलरला उद्देशून हे ट्विट होतं. सेहवागने रॉस टेलरचा भारतीय भाषेत 'दर्जी' असा उल्लेख केला.
सेहवागच्या ट्विटला रॉस टेलरनेही तसंच उत्तर दिलं, तेही हिंदीत.
आधी सेहवाग म्हणाला, “वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील (कपडे शिवण्याच्या) ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली”.
https://twitter.com/virendersehwag/status/922132155844587520
सेहवागच्या या ट्विटला रॉस टेलरने हिंदीत उत्तर दिलं.
“भाई, अगली बार अपना ऑर्डर टाईम पे भेज देना, सो मै आपको अगली दिवाली के पहले डिलिव्हर करुंगा.. हॅप्पी दिवाली”, असं टेलर म्हणाला.
https://twitter.com/RossLTaylor/status/922361751571652609
या ट्विटनंतर गप्प बसेल तो सेहवाग कुठला. सेहवाने टेलरच्या या ट्विटलाही उत्तर दिलं. यावेळी सेहवागने फाईव्ह स्टारच्या जाहिरातीतील डायलॉग मारुन टेलरला उत्तर दिलं.
सेहवाग म्हणाला, “हाहाहा, मास्तरजी, इस साल वाली पतलून एक बिलांग छोटी करके देना नेक्स्ट दिवाली पे. रॉस द बॉस, मोस्ट स्पोर्टिंग”.
https://twitter.com/virendersehwag/status/922362712121683970
यावर टेलरने उपरोधी टोला लगावत,“तुमच्या टेलरने या दिवाळीत चांगले कपडे शिवले नाहीत का?” असं ट्विट केलं.
https://twitter.com/RossLTaylor/status/922369075992453120
यानंतरही सेहवाग शांत बसला नाही. सेहवाग म्हणाला, “दर्जी जी, तुमच्या इतक्या उच्च दर्जाच्या शिवणकामाची स्पर्धा कोणीच करु शकत नाही. मग ते पँट असो वा पार्टनरशीप”
https://twitter.com/virendersehwag/status/922372039884681217
रॉस टेलर-लॅथमची अभेद्य भागीदारी, न्यूझीलंडचा 6 विकेटने विजय
न्यूझीलंडने मुंबईच्या पहिल्या वन डेत भारताचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टॉम लॅथम आणि रॉस टेलरने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 200 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
या सामन्यात न्यूझीलंडचे पहिले तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. पण लॅथमने नाबाद 103 धावांची खेळी उभारून न्यूझीलंडच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. रॉस टेलरचं शतक पाच धावांनी हुकलं. त्याने 95 धावांची खेळी करून लॅथमला साथ दिली.