मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असेल, तर मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर रोजी पहिला सामना रंगेल. तर 24 नोव्हेंबरपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राऊंडवर दुसरा सामना खेळवला जाईल. याशिवाय 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल.
तर 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांची वन डे मालिका सुरु होईल. याशिवाय 20 डिसेंबरला टी-20 मालिकेला सुरुवात होईल.
भारतीय संघ : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, मुरली विजय, के एल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रिद्धीमान साहा, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा